india womens cricket team saam tv
क्रीडा

India Squad: १२ वीची परीक्षा देण्यासाठी न्यूझीलंडविरूद्धच्या सिरीजमधून एक खेळाडू बाहेर; BCCI ने स्वतः दिली अपडेट

India Squad: येत्या काळात भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये वनडे सिरीज खेळवण्यात येणार आहे. यासाठी नुकतंच टीमची घोषणा करण्यात आली आहे.

Surabhi Jagdish

सध्या भारतीय पुरुषांची टीम न्यूझीलंडविरूद्ध टेस्ट सिरीज खेळतेय. यामधील पहिला टेस्ट सामना बंगळूरूच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जातोय. तर दुसरीकडे महिलांची भारतीय टीम न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे सिरीजसाठी तयारी करतेय. नुकंतच या सिरीजसाठी महिलांच्या टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. यामध्ये एका खेळाडूला १२ वीची परीक्षा द्यायची असल्याने ती टीममधून बाहेर झाली आहे.

येत्या काळात भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात वुमेंस वनडे सिरीज रंगणार आहे. यावेळी टीम इंडियाचं सिलेक्शन करताना एक आश्चर्यकारक घटना घडली. भारतीय महिला स्फोटक फलंदाज ऋचा घोष तिच्या 12वीच्या परीक्षेमुळे टीम इंडियातून बाहेर झाली आहे.

२१ वर्षांची आहे ऋचा घोष

ऋचा घोष ही भारतीय महिला टीममधील युवा खेळाडूंपैकी एक आहे. ऋचा केवळ 21 वर्षांची असून त्याने टीम इंडियामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. नुकतंच तिने भारतीय टीमच्या वतीने महिला T20 वर्ल्डकप 2024 मध्ये भाग घेतला होता. परंतु आता बारावीच्या परीक्षेमुळे ती न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सिरीजमधून टीमबाहेर पडली आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती दिलीये. न्यूझीलंडविरूद्धच्या सिरीज २७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

कसं आहे ऋचा घोषचं करियर?

ऋचा घोषने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केला होता. यापूर्वी 2020 मध्ये तिने टी-20 फॉर्मेटमध्ये डेब्यू केला होता. तसंच ऋचाने 2021 मध्ये वनडे डेब्यू केला होता. आतापर्यंत ऋचाने टीम इंडियासाठी फक्त 2 टेस्ट सामने खेळले आहेत ज्यात त्याने 2 अर्धशतकांच्या मदतीने 151 रन्स केलेत. तर वनडेमध्ये 23 वनडेत 3 अर्धशतकांच्या जोरावर 481 रन्स आणि टी- 20 मध्ये ऋचाने 59 सामन्यात 879 रन्स केल्याची नोंद आहे.

कशी आहे न्यूझीलंडविरूद्धच्या वनडे सिरीजसाठी टीम इंडिया?

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उप-कर्णधार), शेफाली वर्मा, डी हेमलता, दीप्ती शर्मा, जेमिमा रोड्रिग्स, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), रेणुका सिंह ठाकूर, तेजल हसब्निस, सयाली सतगरे, अरुंधति रेड्डी, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा, राधा यादव, श्रेयंका पाटिल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Group 1st List: CM शिंदेंविरोधात दिघेंना उमेदवारी, ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली संधी? वाचा...

Diwali Picnic Spot : दिवाळीत 'या' ठिकाणी लाँग ट्रीप प्लान करा, जोडीदार होईल खूश

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Election : CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने निष्ठावंत उतरवला; आतापर्यंत कोणाला मिळाले एबी फॉर्म ? वाचा

Mahayuti News : अजित पवारांसह फडणवीस दिल्लीकडे रवाना; काय आहे कारण, पाहा Video

SCROLL FOR NEXT