on this day virat kohli will comeback on cricket ground know the date ipl 2024  yandex
Sports

Virat Kohli Comeback: केव्हा होणार विराटचं कमबॅक? तारीख आली समोर

IPL 2024: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपासून संघाबाहेर आहे. त्याचं भारतीय संघात कमबॅक केव्हा होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Comeback News:

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपासून संघाबाहेर आहे. त्याचं भारतीय संघात कमबॅक केव्हा होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी त्याने आपलं नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून तो सोशल मीडिया आणि क्रिकेटच्या खेळपट्टीपासून दूर आहे. त्यामुळे तो आयपीएल खेळणार का? आयपीएल खेळणार असेल तर केव्हा मैदानात उतरणार? जाणून घ्या.

येत्या १९ मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा अन्बॉक्स शो होणार आहे. त्यामुळे तो याच दिवशी संघासोबत जोडला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे. विराटबद्दल बोलायचं झालं तर तो अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या टी -२० मालिकेत खेळताना दिसून आला होता. त्यानंतर तो मैदानावर खेळताना दिसून आलेला नाही.

मात्र विराट १९ मार्च रोजी संघासोबत जोडला जाईल याबाबत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू किंवा विराट कोहलीने कुठलीही अपडेट दिलेली नाही. यासह विराट आयपीएल २०२४ स्पर्धा खेळणार की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. अद्यापही विराटचा पत्ता नाही. ही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या फॅन्ससाठी चिंता वाढवणारी बाब आहे. (Cricket news in marathi)

विराट टी -२० वर्ल्डकपमधून बाहेर?

आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघाला टी -२० वर्ल्डकप खेळायचा आहे. त्यामुळे या स्पर्धेचा दृष्टीने आयपीएल स्पर्धा अतिशय महत्वाची असणार आहे. दरम्यान माध्यमांमध्ये असं म्हटलं जात आहे की,टी -२० वर्ल्डकपसाठी विराटला भारतीय संघात स्थान दिलं जाणार नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इन्साईडस्पोर्ट्सला सांगितलं की, ' आम्हाला जितकं माहीत आहे, तो आयपीएल स्पर्धा खेळणार आहे. मात्र तो संघासोबत केव्हा जोडला जाणार हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम अपघात; दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, एकजण ठार

Blood Sugar Level: अचानक ब्लड शुगर लेव्हल कमी झाली, कारण काय? आरोग्यावर काय होतो परिणाम

Tuesday Horoscope: नोकरी व्यवसायात काम करण्याऱ्यांवर लक्ष्मीची कृपा राहणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Mumbai News : मुंबई महापालिकेत सर्वात मोठा बदली घोटाळा; नव्या वादाचा चेंडू थेट CM फडणवीसांच्या कोर्टात

येमेनजवळील समुद्रात मोठी दुर्घटना; जहाजावरील LPG टँकरला भीषण आग, जहाजावर होते २३ भारतीय खलाशी

SCROLL FOR NEXT