टी-२० वर्ल्डकपची फायनल, धोनीचा तो जोगिंदर शर्माला शेवटचं शतक टाकण्याचा धाडसी निर्णय आणि प्रेशरमध्ये श्रीसंथने पकडलेला तो कॅच. या सामन्याला १७ वर्ष होऊन गेली आहेत. मात्र २४ सप्टेंबर हा दिवस उजाडला, की आजही ते चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभं राहतं. आजच्याच दिवशी भारताने फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवत टी-२० वर्ल्डकपची पहिली ट्रॉफी जिंकली होती.
टी-२० वर्ल्डकप २००७ स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत केले गेले होते. ही क्रिकेटमध्ये नवी क्रांती होती. कारण यापूर्वी कधीच टी-२० वर्ल्डकप झाला नव्हता. भारतीय संघाने या स्पर्धेतील सर्व सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आणि फायनलमध्ये प्रवेश केला. फायनलमध्ये भारताचा सामना पाकिस्तानविरुद्ध झाला. याच पाकिस्तानला भारताने बॉल आऊटमध्ये पराभूत केलं होतं.
या प्रेशर सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकअखेर १५७ धावा केल्या. भारताकडून फलंदाजी करताना, गौतम गंभीर हिरो ठरला. त्याने ५४ चेंडूंचा सामना करत २ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने ७५ धावांची खेळी केली. तर रोहितने १६ चेंडूंचा सामना करत ३० धावांची खेळी केली. या सामन्यात विरेंद्र सेहवाग दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याच्याऐवजी इरफान पठाण फलंदाजी करण्यासाठी आला होता.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १५७ धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानला जिंकण्यासाठी १५८ धावांची गरज होती. या धावांचा बचाव करताना, भारताकडून आरपी सिंग- इरफान पठाण यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर जोगिंदर शर्माने २ महत्वाचे गडी बाद केले.
या सामन्यातील शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी जोगिंदर शर्माकडे सोपवण्यात आली होती. या षटकात जोगिंदर शर्माने दिलेल्या षटकांचा यशस्वी बचाव करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.