sakshi malik twitter
Sports

Sakshi Malik Retired: डोळ्यात अश्रू..न्याय मिळण्याची आस...ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिकचा कुस्ती सोडण्याचा निर्णय

Sakshi Malik Retirement News: रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणूकीच्या निकालानंतर भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिकने मोठी घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

Sakshi Malik News:

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणूकीच्या निकालानंतर भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिकने मोठी घोषणा केली आहे. तिने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुकीत संजय सिंग यांनी बाजी मारली आहे. हा निकाल समोर येताच साक्षी मलिकला रडु कोसळलं.

ती म्हणाली की,'आम्ही ४० दिवस रस्त्यावर झोपलो. देशभरातील अनेक भागातून लोक आम्हाला समर्थन करण्यासाठी आले. यात वृ्द्ध महिलांचाही समावेश होता. आमच्याकडे असेही लोकं आली ज्यांच्यांकडे खायला आणि कमवायला काहीच नाही. आम्ही जिंकू शकलो नाही,मात्र सर्वांचे आभार.'

संजय सिंग बनले रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे नवे अध्यक्ष..

या निवडणूकांपूर्वीच बृचभूषण सिंग यांनी असा दावा केला होता की, संजय सिंग हे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे पुढील अध्यक्ष असतील. हा दावा आता खरा ठरलाय. संजय सिंग यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी २००८ मध्ये वाराणसी रेसलिंग फेडरेशनचं अध्यक्षपद भूषवलं होतं. (Sakshi Malik News)

त्यानंतर २००९ मध्ये उत्तर प्रदेशात कुस्ती संघाची घोषणा करण्यात आली त्यावेळी बृजभूषण सिंग यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. तर संजय सिंग यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. (Latest sports updates)

विनेश फोगट भावूक...

साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा करताच, विनेश फोगट भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ती म्हणाली की,' हे खूप दुख:द आहे. आम्ही लढलो, मात्र जिंकू शकलो नाही. मला माहित नाही की आम्हाला न्याय कसा मिळेल. आम्ही न्याय मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. मी युवा खेळाडूंना इतकच सांगेल की,अन्यायाचा सामना करण्यासाठी तयार राहा. कुस्तीचं भविष्य अंधारात आहे,तरी मी आशा करते की, आम्हाला न्याय मिळेल. आम्ही आमचं दु:ख कोणाला सांगाव? आमचा लढा अजुनही सुरुच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गर्भलिंगनिदान प्रकरणात चाकणकरांचं नाव अन् भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Maharashtra Live News Update: यवतमाळमधील पाणीटंचाईवरून मंत्र्यासमोरच महिलांनी प्रशासनाला धरले धारेवर

Pune : पत्नीची हत्या करून केला इमारतीवरून पडल्याचा बनाव; क्राइम थ्रिलर वेब सिरीजपेक्षा खतरनाक घटनेनं पुणे हादरलं

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Maharashtra Ratna Award 2026: कांचनताई बुटाला यांना 'महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार' प्रदान

SCROLL FOR NEXT