
Delhi News: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन (Wrestlers Protest) सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी 28 मे रोजी कुस्तीपटूंचे आंदोनल मोडून काढले. कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनावर मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसंच, हे कुस्तीपटू आंदोलनाला बसलेल्या जंतर-मंतरवरील त्यांचे तंबू आणि खुर्चा पोलिसांनी हटलवले होते.
पोलिसांनी आता कुस्तीपटूंना सोडले आहे. पण आता हे आंदोलन सुरु राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर हे कुस्तीपटू आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. साक्षी मलिकने (Sakshi Malik) याबाबत व्हिडिओ शेअर करत आंदोलनाची पुढची भूमिका सांगितली आहे.
साक्षी मलिकने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत 'आम्ही मागे हटलेलो नाही' असे सांगितले. साक्षी मलिकने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की, 'माझा सर्वांना नमस्कार, तुम्हा सर्वांना माहित आहे की, 28 मे रोजी आम्ही शांततेने मोर्चा काढला होता आणि पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं. अटक केली आणि आमच्यावर एफआयआर दाखल केली. आम्ही कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे किंवा कोणाचंही नुकसान केलेले नाही. एका महिलेला 20-20 पोलीस रोखत होते. त्यांनी आमच्यावर किती अत्याचार केले, हे तुम्ही स्वतःच समजू शकता, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल.'
'हा व्हिडीओ तयार करण्याचे एकमेव कारण म्हणजे, आमचे समर्थक, जे अजूनही कुठे-कुठे थांबले आहेत. गुरुद्वारामध्ये आमची वाट पाहत आहेत. त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, पोलिसांनी सोडल्यानंतर संपूर्ण दिवस आम्ही आंदोलनाची रूपरेषा आखण्यात होतो. आम्ही अजूनही मागे हटलो नाही. आंदोलन सुरूच राहील आणि जे काही होईल ते आम्ही लवकरच कळवू. तुम्ही असेच सपोर्ट करत रहा. धन्यवाद.'
साक्षी मलिकच्या या ट्वीटनंतर कुस्तीपटूंचे आंदोलन सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना सोडून दिले. त्यानंतर पोलिसांनी जंतरमंतरवरून आंदोलकांचे सामान हटवले. दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना जंतरमंतर वगळता इतर कोणत्याही योग्य ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी दिली जाईल, असे सांगितले. लैंगिक छळाप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा या कुस्तीपटूंनी घेतला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.