manu bhakers maternal grandmother uncle die in accident Saam TV
Sports

Manu Bhaker : मनू भाकेरवर दुःखाचा डोंगर कोसळला, आजी आणि मामाचा अपघाती मृत्यू

Manu Bhaker Family Accident News : हरियाणा येथील एका अपघातामध्ये नेमबाजीपटू मनू भाकेरच्या आजीचा आणि मामाचा मृत्यू झाला आहे. स्कूटर आणि ब्रेझा कारची धडकेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

Yash Shirke

Manu Bhaker News : आंतरराष्ट्रीय नेमबाजीपटू मनू भाकेरच्या घरी दुखद घटना घडली आहे. तिच्या आजीचा आणि मामाचा अपघातात मृत्यू झाला आहे. आज (१९ जानेवारी) सकाळी ९ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ही घटना हरियाणाच्या महेंद्रगड बायपास रोडवर घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली आहे.

सकाळी नऊच्या सुमारास महेंद्रगड बायपास रोडवर स्कूटर आणि ब्रेझा कार यांची टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की त्यात मनू भाकेरची आजी आणि मामा जागीच ठार झाले. अपघात झाल्यानंतर कार चालक घटनास्थळावरुन पळून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. पोलिस घटनेचा तपास करत आहेत. ब्रेझा कारच्या चालकाला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

अपघाताच्या दोन दिवसांपूर्वी १७ जानेवारीला मनू भाकेरला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनूने १० मीटर एअर पिस्तूल (वैयक्तिक) आणि १० मीटर एअर पिस्तूल (सांघिक) या दोन स्पर्धांमध्ये दोन कांस्य पदके जिंकली होती. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT