manu bhaker twitter
Sports

Manu Bhaker: विनेशला नोटांचे बंडल; तर मनूला गिफ्ट म्हणून जे मिळालं, ते पाहून हसू आवरणार नाही

Manu Bhaker Rakshabandhan Gift: भारताची स्टार नेमबाज मनू भाकरच्या रक्षाबंधनाची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान तिला तिच्या भावाने हटके गिफ्ट दिलं आहे.

Ankush Dhavre

भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला २ पदकं जिंकून दिली होती. पॅरिसमधून परतल्यानंतर ती सध्या विश्रांतीवर आहे. तिने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात आणि १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात भारताला कांस्यपदक जिंकून दिलं होतं. दरम्यान रक्षाबंधनाच्या दिवशी तिची एक स्टोरी जोरदार व्हायरल होत आहे.

भावाने दिलं हटके गिफ्ट

रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणीला गिफ्ट देतो. १९ ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बॉलीवूड स्टार्ससह क्रीडाविश्वातील स्टार खेळाडूंनीही रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला.

भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकून देणाऱ्या मनू भाकरने (Manu Bhaker) देखील आपल्या भावासोबत रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. राखी बांधल्यानंतर बहिणीला काहीतरी चांगलं गिफ्ट हवं असतं. मात्र इथे मनूला गिफ्ट म्हणून १ रुपयाची नोट देण्यात आली आहे. मनूने १ रुपयाच्या नोटसोबतचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

manu bhaker
manu bhaker

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून परतल्यानंतर मनूने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिने विश्रांती घेतल्यानंतर ती पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. मात्र घरी असताना तिला आईचा ओरडा देखील बसतोय. आणखी एका फोटोमध्ये ती जेवण बनवताना दिसून येत आहे.

विनेश फोगाटने असं साजरं केलं रक्षाबंधन

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर भारतात परतली आहे. ही स्पर्धा तिच्यासाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. तिने या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता.

मात्र फायनल सामन्याच्या दिवशी तिचं वजन १०० ग्रॅम अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. विनेशने देखील रक्षाबंधन साजरं केलं. गिफ्ट म्हणून तिच्या भावाने तिला ५०० रुपयांच्या नोटांची गड्डी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

SCROLL FOR NEXT