IND vs AUS Head to Head saam tv
Sports

IND vs AUS semi final : आकडे पाहता आज टीम इंडियाच जिंकणार! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलचा कसा आहे भारताचा रेकॉर्ड?

IND vs AUS Head to Head: काही काळापूर्वीच ऑस्ट्रेलियाने भारताचे विश्वविजेते होण्याचं स्वप्न भंग केलं होतं. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पराभव केला.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाची आज मोठी परीक्षा आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला असून आज त्यांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. आज दुपारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. ही तेच ऑस्ट्रेलिया आहे जिने आयसीसी स्पर्धांमध्ये भारताला नकोसं करून सोडलं आहे. 2003 ची वर्ल्डकप फायनल असो किंवा 2023 ची वर्ल्डकप फायनल असो. ऑस्ट्रेलियाची टीम म्हटलं की, एक वेगळीच भीती चाहत्यांच्या मनात असते. पण यावेळी भारताचा विजय निश्चित मानावा लागेल.

काही काळापूर्वीच ऑस्ट्रेलियाने भारताचे विश्वविजेते होण्याचं स्वप्न भंग केलं होतं. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा पराभव केला. त्या पराभवाच्या वेदना अजूनही भारतीय चाहत्यांना सतावतायत आणि म्हणूनच जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाशी झालेला सामना फिक्स झाला तेव्हा भारतीय चाहत्यांना मनात पुन्हा एकदा भीती निर्माण झालीये. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीमधील आकडे पाहिले तर चाहत्यांना घाबरण्याची काहीही गरज नाहीये.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाची चमकदार कामगिरी

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या हेड टू हेड आकडेवारीवर एकदा नजर टाकूयात. या आयसीसी स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलियाची टीम एकूण चार वेळा आमनेसामने आल्या आहेत. त्यापैकी भारताने दोनदा विजय मिळवला असून ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे. याशिवाय या स्पर्धेत एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.

हे आकडे भारतीय चाहत्यांना दिलासा देऊ शकतात. टीम इंडियाच्या चाहत्यांना आशा असेल की यावेळी टीम इंडिया याच आकडेवारीनुसार खेळेल आणि जिंकेल. हा सामना जिंकल्यावर टीम इंडियाला थेट फायनलचं तिकीट मिळणार आहे.

वनडेची आकडेवारी कशी?

जर आपण या दोन्ही संघांमधील एकूण वनडे सामन्यांची आकडेवारी पाहिली तर भारतीय टीम आणि चाहत्यांची चिंता वाढू शकते. कारण यामध्ये ऑस्ट्रेलिया वरचढ आहे. दोन्ही टीम्समध्ये खेळल्या गेलेल्या एकूण १५१ वनडे सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने ८४ सामने जिंकले आहेत तर भारताने ५७ सामने जिंकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT