not only kl rahul sanjiv goenka also disrespected ms dhoni in ipl 2016 amd2000 twitter
क्रीडा

KL Rahul - Sanjiv Goenka: केएल राहुलच नव्हे, तर संजीव गोयंकांनी धोनीचाही केला होता अपमान; वाचा नेमकं काय घडलं?

Sanjiv Goenka Disrespected MS Dhoni: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय

Ankush Dhavre

सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका केएल राहुलवर संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत.

या व्हिडिओमध्ये ते केएल राहुलला संघाच्या सुमार कामगिरीचा जाब विचारताना दिसून येत आहेत. तर केएल राहुल नम्र राहुन उत्तर देताना दिसून येत आहे. संजीव गोयंकांकडून स्टार खेळाडूचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी देखील त्यांनी एमएस धोनीचा अपमान केला आहे.

संजीव गोयंका केएल राहुलला हातवारे करुन बोलत होते. हा व्हिडिओ व्हायरल होताच, काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सध्या एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत आहे. ज्यावेळी या संघावर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी एमएस धोनी रायझिंग पुणे सुपरजांयट्स संघाचा कर्णधार होता. या संघाचे मालकी हक्क देखील आरपी -गोयंका यांच्याकडे होते.

आयपीएल २०१६ स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. या हंगामात पुणे संघाला अवघ्या ५ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता. संघाची ही सुमार कामगिरी पाहता संघमालक नाराज झाल्याचे पाहायला मिळाले होते.

त्यानंतर टीम मॅनेजमेंटने धोनीला कर्णधारपदावरुन काढण्याचा निर्णय घेतला होता. धोनीसारख्या वर्ल्डक्लास कर्णधाराला कर्णधारपदावरुन काढून टाकणं हा धोनीचा अपमानच होता. धोनीच्या जागी स्टीव्ह स्मिथकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी असं म्हटलं गेलं होतं की, धोनीला कर्णधार म्हणून नव्हे तर खेळाडू म्हणून खेळायचं होतं त्यामुळे त्याने कर्णधारपद सोडलं होतं. मात्र याबाबत धोनी किंवा इतर कोणीच कुठलंच वक्तव्य केलं नव्हतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

SCROLL FOR NEXT