ms dhoni virat kohli saam tv
Sports

Google Search: ना धोनी, ना विराट; Google वर सर्वाधिक सर्च केलेल्या खेळाडूंच्या यादीत ही भारतीय महिला नंबर १

Vinesh Phogat, Google Search List: २०२४ वर्षात कोण आहेत, सर्वाधिक सर्च केले गेलेले भारतीय खेळाडू ? पाहा संपूर्ण यादी

Ankush Dhavre

वर्ष २०२४ येत्या काही दिवसांत समाप्त होणार आहे. यावर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या यादीत खेळाडूंचा समावेश आहे. या यादीत कुठल्याही नेत्याच्या, बॉलिवूड स्टारचा किंवा उद्योगपतीचा समावेश नाही.

टॉप १० च्या यादीत ५ खेळाडूंचा समावेश आहे. सर्वात आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे, या यादीत विराट कोहली, एमएस धोनी आणि रोहित शर्मासारख्या बड्या खेळाडूंना स्थान मिळालेलं नाही.

कोण ठरलं सर्वाधिक सर्वाधिक सर्च केलं गेलेलं भारतीय?

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट ही गुगलवर सर्वाधिक सर्च केली गेलेली भारतीय खेळाडू ठरली आहे. २०२४ मध्ये विनेश फोगटची जोरदार चर्चा झाली होती. तिने २०२४ मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील रेसलिंग क्रीडा प्रकारातील फायनलमध्ये प्रवेश केला होता.

मात्र फायनल सुरु होण्याच्या काही तासांपूर्वीच तिला अपात्र घोषित करण्यात आलं होतं. तिचं वजन काली ग्रॅम जास्त असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे तिच्या हातून हक्काचं पदक निसटलं होतं. त्यावेळी तिला भारतीयांकडून भरपूर सपोर्ट मिळाला होता.

विनेशने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ती हरियाणातील जुलाना विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीसाठी उभी राहिली आणि जिंकूनही आली. कुस्तीतून निवृत्त होऊनही ती सर्वाधिक सर्च केली गेलेली खेळाडू ठरली.

हार्दिक पंड्या दुसऱ्या स्थानी

खेळाडूंच्या यादीत भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुसऱ्या स्थानी आहे. हार्दिक पंड्याने याच वर्षी मुंबई इंडियन्स संघात कमबॅक केलं. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबईला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर त्याने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत दमदार कामगिरी केली. यासह शशांक सिंग आणि अभिषेक शर्मा हे दोघे देखील सर्वाधिक सर्च केले गेलेले खेळाडू ठरले.

गुगलवर सर्वाधिक सर्च केलं गेलेल्यांची संपूर्ण यादी

  1. विनेश फोगाट

  2. नीतीश कुमार

  3. चिराग पासवान

  4. हार्दिक पांड्या

  5. पवन कल्याण

  6. शशांक सिंह

  7. पूनम पांडे

  8. राधिका मर्चेंट

  9. अभिषेक शर्मा

  10. लक्ष्य सेन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

५० ठिकाणी सर्च ऑपरेशन, संशय येऊ नये म्हणून खाजगी गाड्या! पुणे पोलिसांच्या "ऑपरेशन उमरती" ची A to Z स्टोरी

Nilesh lanke News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची गरज; मालेगाव प्रकरणावर खासदार नीलेश लंकेंची प्रतिक्रिया

Team India Announcement: टीम इंडियाचा कर्णधार बदलला; ODI सीरिजसाठी नव्या संघाची घोषणा

सकाळी नाश्ता करताना अस्वस्थ वाटलं, नंतर हृदयविकाराचा झटका; स्मृती मानधनाच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

Kolhapur Politics: चाणक्यांमुळेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; मुश्रीफ-घाटगेंची युती घडवण्यात फडवणीसांचा हात

SCROLL FOR NEXT