
Syed Mushtaq Ali Trophy, Baroda vs Tamilnadu: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सध्या टफ फाईट पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात बडोदा आणि तामिळनाडू हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली.
तामिळनाडूने बडोदासमोर जिंकण्यासाठी २२२ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना, बडोदाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. यादरम्यान हार्दिक पंड्याने चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतलेल्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली.
या सामन्यात बडोदाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना, तामिळनाडूने २० षटकअखेर २२१ धावा केल्या. तामिळनाडूकडून फलंदाजी करताना, नारायण जगदीशनने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर विजय शंकरने नाबाद ४२ धावा केल्या. शाहरुख खानने ३९ धावांची खेळी केली.
बडोदाला हा सामना जिंकण्यासाठी २२२ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. हार्दिकने ३० चेंडूंचा सामना करत ६९ धावांची खेळी केली. सामना शेवटच्या टप्प्यात असताना, हार्दिक पंड्या बाद होऊन माघारी परतला. मात्र बडोदाने हा सामना जिंकला.
या सामन्यातील १७ वे षटक टाकण्यासाठी गुरजपनीत सिंग गोलंदाजीला आला होता. या षटकात हार्दिकने फलंदाजी करताना २९ धावा चोपल्या. या षटकात त्याने ४ षटकार आणि १ चौकार मारला. त्याने सुरुवातीच्या ३ चेंडूंवर सलग ३ षटकार मारले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारला. यासह त्याने एका षटकात २९ धावा चोपल्या. गुरजपनीत सिंगला चेन्नई सुपर किंग्जने लिलावात २.२ कोटी रुपये मोजत संघात स्थान दिलं आहे.
याच सामन्यातील पहिल्याच डावात हार्दिक पंड्या गोलंदाजी करत असताना विजय शंकरने एकाच षटकात ३ षटकार खेचले होते. आता दुसऱ्या डावात हार्दिकने चांगलाच वचपा काढला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.