Hardik Pandya vs Rohit Sharma SAAM TV
Sports

Hardik Pandya : रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून का खेळला? हार्दिक पंड्यानं संघाबाहेर बसवलं का? इन्टरेस्टिंग इनसाइड स्टोरी

Rohit Sharma - Hardik Pandya : रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला का आला? त्याला संघाबाहेर का बसवलं होतं? की त्याची काही मजबुरी होती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळाली आहेत.

Nandkumar Joshi

मुंबई इंडियन्सला ५ आयपीएल ट्रॉफी जिंकून देणारा माजी कर्णधार रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळायला आला आणि अख्ख्या क्रिकेटविश्वाच्या भुवया उंचावल्या. कर्णधार हार्दिक पंड्या तर कमालीचा ट्रोल झाला. मुंबई संघात आल्यापासून टीकेचा धनी ठरलेला हार्दिक या निर्णयामुळं त्यांच्या डोळ्यांत आणखीच खुपायला लागला. पण रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्यामागचं वेगळंच कारण समोर आलं आहे. आता तरी वादळ शांत होईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा काल शुक्रवारी कोलकाता नाइड रायडर्सविरोधात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला. कोलकाताविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी नाणेफेकीवेळी कर्णधार हार्दिक पंड्यानं याबाबत सांगितलं तेव्हा चाहत्यांना धक्काच बसला होता.

सोशल मीडियावर तर हार्दिकवर ट्रोलधाड पडली. पण रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून का खेळावं लागलं, यामागची खरी स्टोरी समोर आली आहे.

रोहितला काय झालं होतं?

रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला. त्यामागं काही मजबुरी होती का? की त्याला संघाबाहेर बसवलं गेलं, असे अनेक प्रश्न मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माच्या चाहत्यांना पडले होते. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेले त्याचे चाहते तर पंड्यावर तुटून पडले होते. पण यामागची स्टोरी फिरकीपटू पीयूष चावलानं सांगितली.

सलामीवीर रोहित शर्माची पाठ दुखत होती. त्यामुळं त्याला कोलकाताविरुद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट सब म्हणून खेळण्यास भाग पडलं होतं. रोहित शर्माचा पाठीचा त्रास जाणवत असल्यानं हा निर्णय घेतला गेला होता, असं चावलानं स्पष्ट केलं.

फलंदाज म्हणून अपयशी ठरला रोहित शर्मा

कोलकाताविरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणारा रोहित शर्मा फलंदाजीत अपयशी ठरला. १२ चेंडूंत अवघ्या ११ धावाच तो करू शकला. रोहित शर्मानं संथ सुरुवात केली. पण टिकून राहण्याचा प्रयत्न केला. पण सुनील नारायणने फेकलेल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा २४ धावांनी पराभव झाला. या पराभवामुळं प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. आता यामागं फक्त जर-तरची समीकरणं मांडावी लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime : कॉफी शॉपमध्ये पोलिसांची धाड; तरुण- तरुणी सापडले नको त्या अवस्थेत

Maharashtra Live News Update: पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिकमधील अॅप आधारित रिक्षा आणि कॅब सेवा आज बंद

बाईकच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? 99% तुम्हाला माहिती नसेल उत्तर

Shocking: शाळेमध्ये २ विद्यार्थ्यांची आत्महत्या, गळफास घेत संपवलं आयुष्य; पालघर जिल्हा हादरला

Lack of sleep: नीट झोप होत नाही! आरोग्यासाठी ठरतेय सर्वात घातक, संशोधनातून समोर आली झोप उडवणारी माहिती

SCROLL FOR NEXT