मुंबई टी-२० लीग २०२६ मध्ये रविवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील नॉर्थ मुंबई पँथर्सने ईगल ठाणे स्ट्रायकर्सवर ६४ रन्सने विजय मिळवला. या विजयामुळे नॉर्थ मुंबई पँथर्सने आपली विजयी घौडदौड सुरुच ठेवली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये सध्या अव्वल स्थानावर नॉर्थ मुंबई पँथर्सची टीम आहे.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेत पँथर्सने २० ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावून १७७ रन्स केले होते. यामध्ये हार्दिक तामोरेने आक्रमक खेळी करत २९ चेंडूत ४३ रन्स केले. कर्णधार अजिंक्य रहाणेला मात्र या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या २ रन्सवर बाद झाला. त्यानंतर अभिज्ञान कुंदूने जबाबदारीने खेळ करत ४१ चेंडूत ५३ रन्सची अर्धशतकी खेळी साकारली. शेवटच्या टप्प्यात तनुष कोटियनने नाबाद ३७ रन्स आणि वैभव माळीने नाबाद १५ रन्स करत टीमला चांगल्या स्थितीत पोहोचवलं.
१७८ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ईगल ठाणे स्ट्रायकर्सची सुरुवात काहीशी चांगली झाली. सैराज पाटीलने फक्त ८ चेंडूत २५ रन्स केले. यावेळी त्याला टीममधील इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. सतत विकेट्स पडत असल्याने संपूर्ण टीम १५.३ ओव्हर्समध्ये ११३ रन्सवर पव्हेलियनमध्ये परतली.
पँथर्सच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. मोहित अवस्थी, वैभव माळी, राहुल सावंत आणि प्रवेश पाल यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर तनुष कोटियाननेही महत्त्वाची विकेट घेत टीमच्या विजयात हातभार लावला.
या विजयासह नॉर्थ मुंबई पँथर्सने स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली असून संघाची कामगिरी सातत्यपूर्ण आणि प्रभावी ठरतेय. या सामन्यात तनुष कोटियानची 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवड करण्यात आली. त्याच्या कामगिरीमुळे पँथर्सने एकतर्फी विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.