Nitu Ghanghas and Saweety Boora  Twitter
Sports

World Boxing Championships: भारतीय महिला जगात भारी! नितू ,स्विटीने सुवर्ण कामगिरी करत रचला इतिहास

Women's Women's World Boxing Championships: भारतात सुरु असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवत इतिहास रचला आहे.

Ankush Dhavre

Nitu Ghanghas and Saweety Boora : भारतात सुरु असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवत इतिहास रचला आहे.

भारताच्या नितु घंगस आणि स्वीटी बुरा यांनी शनिवारी जोरदार कामगिरी केली आणि भारताला सुर्वणपदक जिंकून दिले आहे.

नितु घंगसने ४८ किलो वजनी गटात मंगोलियाच्या लुत्सायखानला पराभूत करत ५-० ने विजय मिळवला. यात विशेष बाब म्हणजे कझाकस्तानची लुतसाईखान हिने दोन वेळेस आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिकंले होते.

तिच्या विरुद्ध खेळताना नितु जराही डगमगली नाही.

नितु नंतर स्वीटी बुराने ८१ किलो वजनी गटात चीनच्या वॅंग लिनाला धूळ चारली. तिने या सामन्यात ४-३ ने जोरदार विजय मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

यापूर्वी २०१४ मध्ये तिने जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या लाईट वेट कॅटेगरीमध्ये रौप्यपदकाला गवसणी घातली होती.

नितुने आक्रमक सुरुवात करत प्रतिस्पर्धी खेळाडूवर सुरुवातीपासूनच दबाव बनवून ठेवला होता. या विजयासह नितू जागतिक विजेतेपद जिंकणारी सहावी भारतीय बॉक्सर ठरली आहे.

या यादीत सहा वेळची चॅम्पियन मेरी कोम (२००२,२००५, २००६, २००८, २०१० आणि २०१८), सरिता देवी (२००६), जेनी आरएल (२००६), लेखा केसी (२००६) आणि निखत जरीन (२०२२) यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT