Rinku Singh saam tv
Sports

Who Is Rinku Singh: सफाई कामगार ते KKR चा 'वंडर बॉय', असा आहे Rinku Singh चा आतापर्यंतचा प्रवास..

Rinku Singh Struggle Story: या मॅचविनर खेळाडूची गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Ankush Dhavre

Rinku Singh KKR: आयपीएल २०२३ स्पर्धेतील १३ वा सामना कोलकाता गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या रोमांचक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून ३ गडी राखून विजय मिळवला.

शेवटच्या षटकांमध्ये रिंकू सिंगने ५ चेंडूंवर सलग ५ षटकार मारून कोलकाता नाईट रायडर्स संघाला हा सामना जिंकून दिला. या मॅचविनर खेळाडूची गोष्ट अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न बाळगणारा रिंकू सिंग हा मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आला आहे. त्याच्या कुटुंबात ५ भावंडं आहेत. या भावंडांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. रिंकूचे वडील घरोघरी सिलेंडर पोहचवण्याचं काम करतात.

आयपीएलमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर पैसा आला प्रसिद्धी आली मोठं घर घेतलं. तरीदेखील त्याचे वडील अत्यंत साधेपणाने छोट्याच घरात राहतात. तसेच अजूनही त्यांची गॅस एजंसी सुरूच आहे.

तर छोटा भाऊ ऑटो रिक्षा ड्राइव्हर आणि दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ हा कोचिंग सेंटरमध्ये नोकरी करतो. रिंकू सिंगच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर तो नववीत शिकत असताना नापास झाला होता. शिक्षण कमी त्यामुळे त्याला नोकरी मिळण्यात अडचणी येत होत्या.

अथक प्रयत्न केल्यानंतर मोठ्या भावाने त्याला नोकरी मिळवून दिली. ही नोकरी होती सफाई कामगार, म्हणजेच झाडू मारण्याची नोकरी. (Latest sports updates)

आयुष्यातील कठीण काळ सुरू होता. मात्र तो कुठेही डगमगला नाही. घर चालवायचं की क्रिकेट खेळायचं? असा प्रश्न त्याच्यासमोर होता. दरम्यान २०१५ मध्ये त्याच्या कुटुंबावर ५ लाख रुपयांचं कर्ज होतं.

त्यावेळी तो उत्तर प्रदेश संघाच्या १९ वर्षाखालील संघात खेळायचा, त्यामुळे त्याला भत्ता मिळायचा. याच पैशांनी त्याने आपल्या कुटुंबावर असलेला भार कमी करत कर्ज फेडलं. २०१७ मध्ये झालेल्या आयपीएल लिलावात त्याची जणू लॉटरीच लागली कारण पंजाब किंग्ज संघाने त्याला १० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले.

पंजाब किंग्ज संघात असताना रिंकू सिंग कोण आहे हे खूप कमी लोकांना माहीत होतं. मात्र २०१८ मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने ८० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले. तेव्हापासून तो या संघाचे प्रतिनिधित्व करतोय.

आता गुजरात टायटन्स संघाविरुद्ध केलेल्या विस्फोटक खेळीनंतर रिंकू सिंग कोण आहे? हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. कारण धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात ५ षटकार मारणारा फलंदाज कोण? असं विचारलं तर यापुढे रिंकू सिंग हे नाव घेतलं जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT