nitish rana saam tv
Sports

Nitish Rana On KKR Loss: घरच्याच मैदानावर पराभव झाल्याने नितीश राणा भडकला! सामन्यानंतर सांगितलं पराभवाचं कारण

KKR VS SRH Match Highlights: सामना झाल्यानंतर कर्णधार नितीश राणाने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

Ankush Dhavre

Nitish Rana Statement: आयपीएल २०२३ स्पर्धेतील १९ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या सामन्यात हॅरी ब्रुकच्या शतकी खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाने २२८ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला अवघ्या २०५ धावा करता आल्या.

दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार नितीश राणाने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

पराभवाला कारणीभूत कोण?

हा सामना झाल्यानंतर कर्णधार नितीश राणाने म्हटले की, 'आम्ही ठरवलेल्या रणनीतीनुसार गोलंदाजी झाली नाही. गोलंदाज आणखी चांगली गोलंदाजी करू शकले असते. रिंकू आणि मी ज्याप्रकारे फलंदाजी केली, त्याचा मला आनंद आहे. जितकं होईल तितकं टार्गेटच्या जवळ पोहोचणं हाच आमचा प्रयत्न होता. घरच्या मैदानावर खेळण्याचा नक्कीच फायदा होतो. या खेळपट्टीवर २०० धावा सहजरित्या केल्या जातात. मुख्य गोलंदाजांनी जास्त धावा खर्च केल्या. मात्र दिवस आपला नसेल तर असं होतं.' (Latest sports updates)

एडन मार्करमने केले खेळाडूंचे कौतुक..

तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार एडन मार्करमने आपल्या खेळाडूंचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्याने सामना झाल्यानंतर म्हटले की,'गोलंदाजांचं कौतुक, खरंच चांगली गोलंदाजी केली. त्यांचा फलंदाजी क्रम पाहता हा स्कोर सुरक्षित नव्हता. त्यांच्या होम ग्राउंडवर हरवणं समाधानकारक होतं. आमच्या फलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. हॅरी ब्रुक कसा फलंदाज आहे हे सर्वांनाच माहित आहे. तो पावर प्लेच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करतो. काही गोष्ट आहेत ज्यात आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. आशा करतो की ही कामगिरी अशीच सुरु राहील.'

तर कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायच झालं तर, कोलकाता नाईट रायडर्स संघाने या हंगामात आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. यांपैकी २ सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाला परभावाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT