European Cricket League saam tv
Sports

Viral video : गोलंदाजाने लावल्या चक्क 9 स्लिप, तरीही चेंडूने चकवा दिला, मजेशीर व्हिडिओ तुफान व्हायरल

क्रिकेट अनिश्चितताओं का खेल हैं, असं म्हटलं जातं, ते खरंच आहे, कारण...

नरेश शेंडे

मुंबई : क्रिकेट अनिश्चितताओं का खेल हैं, असं म्हटलं जातं, ते खरंच आहे. क्रिकेट सामन्यात रचलेले नवनवीन प्लान एखादा खेळाडू चमदकार कामगिरी करून मोडून काढतो. क्रिकेटमध्ये अटीतटीचा सामना सुरु असल्यास कोणत्या संघाच्या बाजूने विजयाची पताका फिरेल, याचा नेम नाही. एका गोलंदाजाने फलंदाजाला रोखण्यासाठी एक-दोन नाही, तर चक्क नऊ फिल्डर्स स्लिपमध्ये उभे केले. परंतु, फलंदाजाच्या चालाखीचा अंदाज ना गोलंदाजाला आला ना फिल्डर्सला...( European Cricket League funny video goes viral)

युरोपियन क्रिकेट लीगमध्ये फिल्डिंगचा जबरदस्त नजारा पाहायला मिळाला. एका गोलंदाजाने नऊ खेळाडूंना (nine players in sleep) स्लिपमध्ये फिल्डिंगसाठी उभं केलं. मात्र, त्यानंतरही फलंदाजाने फटका दिलेल्या चेंडूला हे खेळाडू रोखू शकले नाहीत. रोमानिया आणि नॉर्वे यांच्यात लीग सुरु असून 18 व्या सामन्यात हा नजारा पाहायला मिळाला. या सामन्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नॉर्वेने ग्रुप डी च्या सामन्यात प्रथम फलंदाजी करून 10 षटकात 8 विकेट्स गमावून 97 धावा केल्या.

त्यानंतर रोमानियाचा संघ 98 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र, रोमानियाने 10 षटकात 7 विकेट्स गमावून 54 धावाच केल्या. त्यामुळे रोमानियाला टार्गेटच्या जवळही जाता आलं नाही. परंतु, रोमानियाच्या एका फलंदाजाने आक्रमक खेळी करायला सुरुवात केल्यावर नॉर्वेच्या गोलंदाजांच्या भुवया उंचावल्या.

त्यानंतर नॉर्वेच्या गोलंदाजाने फलंदाजाला बाद करण्यासाठी नऊ खेळाडू फिल्डिंगसाठी स्लिपमध्ये उभे केले. नॉर्वे संघाने जबरदस्त फिल्डिंगची रणनीती आखल्यावरही रोमानियाचा फलंदाज चेंडूवर फटका लगावण्यात यशस्वी झाला. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहतेही हा व्हिडिओ पाहून लोटपोट हसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Update: आधार अपडेटचा नवीन नियम! आता घरबसल्या करा कौटुंबिक माहितीत बदल, प्रोसेस काय? वाचा सविस्तर

Railway Update : १२ तासानंतर हार्बर रेल्वेसेवा सुरळीत; मध्य आणि पश्चिम रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने, प्रवाशांचे हाल

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Kareena Kapoor : कोल्हापुरी चप्पल अन् समुद्रकिनारा; करीनाचा देसी स्वॅग, Pradaला टोमणा मारत म्हणाली...

Somwar Upay: सोमवारच्या दिवशी करा 'या' सोप्या उपायांनी मिळवा सुख-शांती; भगवान शंकरही होतील प्रसन्न

SCROLL FOR NEXT