IPL 2023: CSK चाहत्यांसाठी मोठी बातमी; पुढच्या वर्षी खेळण्याबाबत धोनीने म्हटलं...

धोनीने पुढच्या सीझनसाठी चेपॉकला येणार असल्याची घोषणा करताच चाहते मोठ्याने ओरडू लागले.
MS Dhoni
MS Dhoni Saam Tv

नवी दिल्ली : चेन्नई सुपर किंग्ज आणि क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आयपीएल 2023 (IPL) मध्ये सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे. त्याच्या आयपीएल फ्रँचायझिशी संबंधित एका कार्यक्रमात त्याने याबाबत माहिती दिली. धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून तो फक्त आयपीएल खेळत आहे. मात्र धोनीच्या आयपीएल निवृत्तीच्या चर्चाही अधूनमधून येत असतात.

MS Dhoni
T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपआधी 'या' विस्फोटक फंलंदाजावर संकट, क्रिकेटमध्ये चार वर्षांसाठी घातली बंदी

धोनीने या कार्यक्रमात सांगितलं की, तो पुढील वर्षी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर परतणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा त्यांच्या होम ग्राऊंडवर 2019 मध्ये सामना झाला होता. यानंतर कोरोनामुळे 2020 मध्ये आयपीएलचं आयोजन यूएईमध्ये करण्यात आलं होतं. तर 2021 मध्ये दुसरा टप्पा यूएईमध्येच खेळला गेला.

आयपीएल 2022 चे सामने मुंबई आणि पुण्यात खेळले गेले. यानंतर क्वालिफायर आणि फायनल कोलकाता आणि अहमदाबाद येथे पार पडल्या. मात्र पुढील वर्षीपासून ही लीग होम आणि अवे फॉरमॅटनुसार खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत सर्व संघ आपापल्या घरच्या मैदानांवरही खेळतील.

MS Dhoni
Team India : टी20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराहची जागा कोण घेणार? समोर आलं 'या' खेळाडूचं नाव

धोनी चेन्नईला गेला असता तिथे एका कार्यक्रमात विचारण्यात आले की तो आयपीएल 2023 मध्ये खेळणार आहे का? त्यावर धोनीने उत्तर दिले, आम्ही पुढच्या वर्षी चेपॉकमध्ये परत येऊ. धोनीने पुढच्या सीझनसाठी चेपॉकला येणार असल्याची घोषणा करताच चाहते मोठ्याने ओरडू लागले.

2023 धोनीचे आयपीएलमधील शेवटचे वर्ष असू शकते

धोनी आणि सीएसकेच्या चाहत्यांसाठी आयपीएलचा 16वा सीझन खास असू शकतो. कारण धोनीने गेल्यावर्षी म्हटले होते की, तो आयपीएलमधून निवृत्तीचा कोणताही निर्णय घरच्या मैदानावर म्हणजेच चेन्नईमध्ये खेळल्यानंतरच घेईल. अशा परिस्थितीत 2023 हे धोनीचे आयपीएलमधील शेवटचे वर्ष असू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com