nicholas pooran  saam tv
क्रीडा

MI New York Winning Moment: १० चौकार,१३ षटकार अन् १३७ धावा करत मुंबईला बनवलं चॅम्पियन; विजयानंतर पूरनचं भन्नाट सेलिब्रेशन- VIDEO

Nicholas Pooran Celebration: संघाला विजय मिळवून देताच निकोलस पूरनने जोरदार सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

MI New York vs Seattle Orcas Final: मेजर लीग २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना MI न्यूयॉर्क आणि सिएटल ऑर्कास या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सची फ्रँचायजी असलेल्या MI न्यूयॉर्क संघाने सिएटल ऑर्कास संघावर ७ गडी राखून विजय मिळवला.

यासह पहिल्याच हंगामात जेतेपदाला गवसणी घातली आहे. MI न्यूयॉर्क संघाचा कर्णधार निकोलस पूरन विजयाचा हिरो ठरला आहे.

दरम्यान संघाला विजय मिळवून देताच निकोलस पूरनने जोरदार सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

निकोलस पूरनचे जोरदार सेलिब्रेशन..

अंतिम सामन्यात MI न्यूयॉर्क संघाला विजय मिळवून देण्यात कर्णधार निकोलस पुरनने महत्वाची खेळी केली आहे. त्याने ५५ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि १३ षटकारांच्या मदतीने १३७ धावांची खेळी केली.

केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने त्याने १८ चेंडूंचा सामना करत ११८ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर त्याने २४ चेंडू शिल्लक ठेऊन संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर तो जोरदार जल्लोष साजरा करताना दिसून आला आहे.

या विजयानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात निकोलस पूरन विनिंग शॉट मारल्यानंतर मैदानावर लोळताना दिसून आला आहे. तर संघातील खेळाडूंनी मैदानात जाऊन त्याला उचलून घेतल्याचे पाहायला मिळाला आहे. (Latest sports updates)

या सामन्यात नाणेफेक गमावुन फलंदाजीला आलेल्या सिएटल ऑर्कास संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ९ गडी बाद १८३ धावा केल्या होत्या. सिएटल ऑर्कास संघाकडून खेळताना क्विंटन डी कॉकला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

या धावांचा पाठलाग करताना MI न्यूयॉर्क संघाने २४ चेंडू शिल्लक असतानाच ७ गडी राखून विजय मिळवला. MI न्यूयॉर्क संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला होता. स्टिव्हन टेलर ३ चेंडूंचा सामना करत माघारी परतला.

त्यानंतर शायन जहागीरला देखील हवी तशी कामगिरी करता आली नाही. शेवटी कर्णधार निकोलस पूरनने २४९.०९ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत ५५ चेंडूंमध्ये १० चौकार आणि १३ षटकारांच्या मदतीने १३७ धावांची खेळी केली. तर डेवाल्ड ब्रेविसने २० धावांचे योगदान दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT