नवी दिल्ली: ऑस्ट्रेलिया दिवसेंदिवस टी20 वर्ल्डकपचा (T20 World Cup) उत्साह वाढत आहे. आजच्या सामन्यात न्यूझीलंडने आर्यर्लंडचा पराभव करून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलिस्टबाबत शनिवारी समजलं जाणार आहे. ग्रुप 2 मध्ये भारत, पाकिस्तान किंवा दक्षिण आफ्रिका, कोणता संघ क्वालिफाय होणार? जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती
न्यूझीलंडने आर्यर्लंडला 35 धावांनी पराभूत केल्यानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा रनरेटही जबरदस्त आहे. सेमीफायनलमध्ये (world cup semifinal) पोहोचणारी न्यूझीलंड पहिली टीम ठरली आहे. तर सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या दुसऱ्या टीमचा निर्णय उद्या पाच नोव्हेंबरला होणार आहे. या दिवशीही ग्रुप-1 मधून दुसरी टीम आपली जागा पक्की करणार. ही टीम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यापैकी एक असू शकते. म्हणजेच अजूनही श्रीलंकेला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. (New zealand entered in semifinal india pakistan decision on sunday)
रविवारी होणार भारत, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानचा निर्णय
सुपर-12 च्या ग्रुप-2 मध्येही तीन टीम भारत, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका सेमीफायनलची दावेदार आहे. या तिन्ही टीमचे शेवटचे सामने रविवारी 6 नोव्हेंबरला होणार आहेत.सेमीफायनल मध्ये पोहोचणारे इतर दोन टीम कोणत्या असणार, याबाबत रविवारीच समजणार आहे. पंरतु, यामध्ये टीम इंडियाचं स्थान निश्चित मानलं जात आहे.
कारण भारत सहा गुणांनी अव्वल स्थानावर आहे. सर्वच संघांना त्यांचे सामने जिंकणे गरजेचं आहे. भारताचा शेवटचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे. या सामन्यात पावसाचा खेळ झाला, तरीही टीम इंडियाला एक गुण मिळून संघ सात गुणांवर पोहचेल. त्यामुळे भारत थेट सेमीफायनलमध्ये पोहचेल. जर तिन्ही संघांनी त्यांचे सामने जिकंले, तर पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर जाईल.
सुपर 12 मध्ये ग्रुप-2 चं समीकरण कसं आहे?
जर भारत आणि दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला, तर पाकिस्तानचा संघ बाहेर होईल. भारताची लढत झिम्बाब्वे आणि आफ्रिका नेदरलॅंड विरुद्ध सामना खेळणार आहे. तर पाकिस्तानचा संघ बांगलादेश विरुद्ध भिडणार आहे. भारत आणि आफ्रिकेमध्ये कोणचा पराभव झाल्यास, पाकिस्तान त्यांचा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये प्रेवश करेल. भारताचा सामना पावसामुळं रद्द झाल्यास दोन्ही संघांना 1-1 पॉईंट मिळेल. त्यानंतरही भारतीय टीम क्वालिफाय करेल.
जर आफ्रिका टीमचा सामना पावसामुळं रखडला आणि पाकिस्तानचा विजय झाला, तर दोघांचे 6-6 पॉईंट होतील, अशा परिस्थितीत जास्त सामने जिंकण्याच्या नियमानुसार पाकिस्तानची टीम क्वालिफाय होईल. पाकिस्तानने आफ्रिकेपेक्षा एक सामना जास्त जिंकला आहे. जर पाकिस्तानच्या सामन्यात पावासाने खोडा घातला, तर आफ्रिका टीम सामना जिंकून क्वालिफाय होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.