अफगाणिस्तान संघाचा माजी कर्णधार नबीला चांगली कामगिरी करण्याचा फायदा झाला आहे. आयसीसीने बुधवारी आयसीसीने वनडे ऑलराउंडरची रँकिग जारी केली. या रँकिंगमध्ये अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबीने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने बांगलादेशच्या ऑलराउंडर शाकिब हल हसनला पिछाडलं आहे. नबीकडे ३१४ अंक आहेत. तर शाकिब हल हसनने ३१० अंक मिळवत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. (Latest Marathi News)
३९ वर्षीय मोहम्मद नबीने श्रीलंकेच्या विरोधात जोरदार प्रदर्शन केलं आहे. नबीने श्रीलंकेच्या विरोधात शतकी खेळी खेळली. नबीने १३० चेंडूचा सामना करत १३६ धावा कुटल्या. या खेळानंतर आयसीसी ऑलराउंडर रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
तत्पूर्वी, आयसीसी ऑलराउंडरच्या रँकिंगमध्ये वयस्क खेळाडू ठरला आहे. याआधी श्रीलंकेचा माजी खेळाडू तिलकरत्ने दिलशानच्या नावावर हा मोठा विक्रम होता. ३८ वर्ष ८ महिन्याचा असताना दिलशानने रँकिगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब हसन हा दीर्घ काळापासून दुखापतीशी सामना करत आहे. भारतात विश्वचषक स्पर्धा सुरु असताना शाकिब अल हसन अर्ध्यातूनच स्पर्धा सोडून मायदेशी परतला होता. त्यानंतर त्याच्या डोळ्यावरही परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे दीर्घ काळापासून संघातून बाहेर आहे. बांगलादेशने शाकिबला कर्णधार पदापासूनही दूर केलं आहे. गेल्या पाच वर्षापासून शाकिब हल हसन ऑलराउंडर रँकिगमध्ये पहिल्या स्थानावर होता.
१४ फेब्रुवारीला बुधवारी आयसीसी ऑलराउंडरची रँकिगची ताडी आकडेवारी आली. या आकडेवारीत भारताचा रवींद्र जडेजाचं दहावं स्थान आहे. जडेजाने शेवटचा सामना २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर एकही सामना खेळला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.