महिलांच्या अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेला १५ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात नेपाळ आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.
या सामन्यात नेपाळच्या खेळाडूंनी पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. हा सामना नेपाळने ६ गडी राखून आपल्या नावावर केला आहे. या शानदार विजयासह नेपाळने टॉप ४ मध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतून बाहेर पडला आहे.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर पाकिस्तानने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकअखेर अवघ्या १०४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नेपाळच्या फलंदाजांनी ६ गडी राखून आपल्या नावावर केला.
नेपाळकडून खेळताना कर्णधार पूजा महातोने शानदार कामगिरी केली. तिने या सामन्यात ४ षटक गोलंदाजी केली आणि २ गडी बाद केले. गोलंदाजीत शानदार कामगिरी केल्यानंतर तिने फलंदाजी करतानाही पाकिस्तानच्या गोलंदाजांचाही चांगलाच समाचार घेतला.
तिने धावांचा पाठलाग करताना ४७ धावांची खेळी केली. ज्या खेळपट्टीवर पाकिस्तानच्या फलंदाजांना १०० धावा करण्यात घाम फुटला. त्याच खेळपट्टीवर नेपाळच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली.
तर पाकिस्तानच्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर कोमल खानने ३८ धावांची खेळी केली आणि महम अनीसने २९ धावा केल्या.
या पराभवामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. कारण नेपाळचा संघ सुपर ४ साठी पात्र ठरला आहे. तर पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानला या स्पर्धेतील सुपर ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी नेपाळला पराभूत करायचं होतं. मात्र असं काहीच झालेलं नाही. या स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करुन दाखवली आहे. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघदेखील आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा एकतर्फी धुव्वा उडवला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.