Neeraj Chopra  X
Sports

Neeraj Chopra : माझ्या देशभक्तीवर प्रश्न करणाऱ्यांनो...! अर्शद नदीमवरुन ट्रोल करणाऱ्यांना नीरज चोप्राचं सडेतोड उत्तर

Pahalgam Terrorist Attack : काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. यात हल्ल्याचे पडसाद भारत-पाकिस्तान या दोन देशातील संबंधांवर पडले आहेत.

Yash Shirke

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमला नीरज चोप्राने एनसी क्लासिक स्पर्धेसाठी आमंत्रण दिले. या आमंत्रणावरुन नीरज चोप्राला ट्रोल केले जात आहे. ट्रोलिंगनंतर नीरजने अर्शद नदीमला भारतात का बोलावले याचे स्पष्टीकरण दिले आहे. नीरजने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे.

काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप नागरिकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गोळीबारामध्ये अनेकजण जखमी देखील झाले. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट पसरली आहे. याचे पडसाद क्रीडाक्षेत्रावर पडले आहेत. यापुढे पाकिस्तानशी क्रिकेटचे सामने नको अशी मागणी केली जात आहे. अशातच पाकिस्तानच्या अर्शद नदीमला भारतात येण्याचे आमंत्रण दिल्याने नीरज चोप्रावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

'माझ्यासाठी देश सर्वात महत्त्वाचा आहे आणि यापुढेही राहील. जगात भारताचे नाव सर्वाच्चन स्थानी नेण्यासाठी, देशाला आदर मिळवून देण्यासाठी मी आणखी मेहनत करेनच. मी सहसा कमी बोलत, पण याचा अर्थ असा नाही की, जे चुकीचे असेल, त्यावर मी गप्प बसेन. जेव्हा कुणी माझ्या किंवा माझ्या कुटुंबांच्या देशभक्तीवर शंका घेईल तेव्हा तर गप्प बसणार नाहीच...' असे नीरज चोप्राने पोस्टमध्ये म्हटले आहे.

नीरजच्या पोस्टमध्ये 'मला आणि माझ्या कुटुंबीयांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूने आमंत्रण दिले होते, इतकंच.. जगभरातील सर्वोत्तम खेळाडूंना भारतात बोलावून भारताला जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र बनवण्याच्या उद्देशाने एनसी क्लासिक स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले होते. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी सर्व खेळाडूंना आम्ही निमंत्रण पाठवले होते' असे लिहिले आहे.

'मागील ४८ तासांमध्ये घडलेल्ल्या सर्व गोष्टींनंतर, अर्शदला एनसी क्लासिकमध्ये भाग घेणे अशक्य होते. माझा देश आणि माझ्या देशाचे हित हे सर्वोपरी आहेत. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. संपूर्ण देशासह मी सुद्धा दुखावलो गेलो आहे. दहशतवादी हल्ल्याला आपल्या देशाकडून चोख प्रत्युत्तर देईल असा मला विश्वास आहे', असे नीरजने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT