world athletics championships 2022 india saam tv
Sports

World Athletics Championship 2022 : नीरज पाठोपाठ भालाफेकीत रोहित यादव चमकला; सहा खेळाडू अंतिम फेरीत

आज देशातील खेळाडूंनी मिळविलेल्या यशानंतर क्रीडाक्षेत्रात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.

Siddharth Latkar

नवी दिल्ली : जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत (world athletics championships 2022) आज सकाळच्या प्रहरी युवा खेळाडूंची धडकन असलेल्या नीरज चोप्राने (neeraj chopra) सर्वाेत्तम कामगिरी करीत स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. त्यापाठाेपाठ भारताच्या राेहित यादव (Rohit Yadav) (भालाफेक), एल्डोस पाॅल (Eldhose Paul) (तिहेरी उडी) यांनी देखील उत्तम कामगिरी करीत स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली आहे. याबराेबरच मराठमाेळा अविनाश साबळे (Avinash Sable) (तीन हजार मीटर स्टीपलचेस) , मुरली श्रीशकरं (लांब उडी), अन्नु राणी (भालाफेक) हे भारतीय (indian) खेळाडू (players) अंतिम फेरीत आपले काैशल्य सिद्ध करणार आहेत. (world athletics championships 2022 india marathi news)

आज सकाळी नीरज चोप्राने (88.39) मीटर अंतरावर भालाफेक करुन पहिल्याच प्रयत्नांत मैदान मारंल. त्यापाठाेपाठ रोहित यादवने (80.42) मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह विजय मिळवला. पुरुषांच्या तिहेरी उडीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला एल्डोस पाॅल (Eldhose Paul) हा पहिला भारतीय खेळाडू आहे.

दरम्यान पुरुषांत नीरज चाेप्र तर महिला गटात भारताची अन्नू राणी उद्या भालाफेकमध्ये अंतिम फेरीत उत्तम कामगिरी करण्यासाठी मैदानात असेल. तिने तिच्या गट (ब) पात्रता फेरीत ५९.६० मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह ५ वे स्थान पटकावले. एकूणच राणीने 8 व्या स्थानावर जपानच्या हारुका किटागुचीने (64.32) मीटरच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट थ्रोसह अव्वल स्थान पटकावले, त्यानंतर चीनच्या शियिंग लिऊ (63.86) मीटर आणि लिथुआनियाच्या लिव्हटा जासीयुनाईटे (63.80) मीटर स्थानावर आहे.

भारतीय खेळाडूंनी मिळविलेल्या यशामुळे आज सकाळपासून समाज माध्यमातून त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव हाेऊ लागला आहे. अनेक जण ट्विट करुन भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

SCROLL FOR NEXT