neeraj chopra  yandex
Sports

Neeraj Chopra Final: मिशन गोल्ड! नीरज चोप्राची फायनल केव्हा,कधी अन् किती वाजता सुरु होणार?

Neeraj Chopra Final Time and date: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत मंगळवारी भारतीय खेळाडूंचा डबल धमाका पाहायला मिळाला आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील ११ वा दिवस अतिशय महत्वाचा होता. कारण यादिवशी सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार असणारा नीरज चोप्रा अॅक्शनमध्ये येणार होता.

भालाफेक क्रीडा प्रकारातील पात्रता फेरीत भारताकडून २ खेळाडू मैदानात उतरले होता. भालाफेकपटू किशोर जेनाचा पात्रता फेरीसाठी ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला होता. तर नीरज चोप्राचा बी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला होता.

किशोर जेनाला पात्रता फेरीत ठराविक अंतराइतका थ्रो करता आला नाही. त्यामुळे तो फायनलसाठी पात्र ठरु शकलेला नाही. तर पात्रता फेरीत ग्रुप बी मधून नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर लांब भाला फेकला. यासह त्याने पहिल्याच प्रयत्नात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (Neeraj Chopra)

केव्हा होणार सामना?

नीरज चोप्राला (Neeraj Chopra) ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. भालाफेक प्रकारातील फायनलचा सामना ८ ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ११:५५ वाजता सुरु होईल. नीरज चोप्राने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. या स्पर्धेत त्याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं होतं. नीरजसमोर रिपब्लिकच्या याकुब वाडलेच,पाकिस्तानचा अर्शद नदीम,जर्मनीचा ज्युलियन वेबर, ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स यांचे आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT