neeraj chopra twitter
क्रीडा

Neeraj Chopra Dope Test: सिल्व्हर मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्राची डोप टेस्ट! फायनलनंतर नेमकं काय घडलं?

Ankush Dhavre

पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. त्याने सुवर्ण पदकासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या नीरज चोप्राला मागे सोडत सुवर्ण पदकावर निशाणा साधला आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या नीरज या स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावणार असं वाटलं होतं. मात्र अर्शद नदीमने एकच थ्रो केला आणि सुवर्ण पदकावर आपलं नाव जवळपास निश्चिच केलं. फायनलच्या सामन्यानंतर अर्शद नदीमची डोप टेस्ट घेण्यात आली. त्यामुळे तो ३ ते ४ तास स्टेडियममध्येच होता.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील फायनलचा सामना भारतीय वेळेनुसार ८ ऑगस्ट रोजी रात्री ११:४५ मिनिटांनी सुरु झाली. तर १ वाजता अर्शद नदीमने सुवर्ण पदक पटकावल्याची बातमी आली. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,अर्शद नदीमला तासभर स्टेडियममध्ये थांबवण्यात आलं. केवळ अर्शद नदीमलाच नव्हे तर नीरज चोप्राला आणि कांस्य पदक पटकावणाऱ्या अँडरसन पीटर्सचीही डोप टेस्ट करण्यात आली.

अर्शद नदीमने साधला सुवर्ण पदकावर निशाणा

या फायनलमध्ये अर्शद नदीमने सुवर्ण पदकावर निशाणा साधला. पहिला थ्रो फाऊल गेल्यानंतर दुसऱ्या थ्रो मध्ये त्याने पूर्ण जोर लावला आणि दमदार कमबॅक केलं. त्याचा दुसरा थ्रो ९२.९७ मीटरचा होता. या थ्रो मुळे त्याचा सुवर्णपदकासाठीचा दावा आणखी मजबूत झाला. त्यानंतर नीरजने ८९.४५ मीटर थ्रो केला. हा थ्रो केल्यानंतर नीरजचा आत्मविश्वास वाढला. त्याने आणखी लांबचा थ्रो येणार असा इशारा केला. मात्र त्याला कमबॅक करत आलं नाही. ८९.४५ हा त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. हा त्याच्या कारकिर्दीतीलही सर्वोत्तम थ्रो ठरला. या थ्रो च्या बळावर त्याने रौप्य पदकावर निशाणा साधला.

विजयानंतर काय म्हणाला अर्शद नदीम?

डोप टेस्ट झाल्यानंतर अर्शद नदीमने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने आपल्या फिटनेसबाबत मोठा खुलासा केला.त्याने सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी तो पायाच्या दुखण्याने त्रस्त होता. मात्र त्याने आपल्या फिटनेसवर काम केलं. लहानणपणी अर्शद नदीम क्रिकेट खेळायचा. तो उत्तम वेगवान गोलंदाज होता.मात्र शरीरयष्टी पाहता त्याच्या कोचने त्याला भालाफेक खेळण्याचा सल्ला दिला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT