navin over saam tv
Sports

Wd 1 N4 Wd Wd Wd Wd 4 W 1 1 Wd 1: झिम्बाब्वेविरूद्ध नवीन उल हकने टाकली १३ चेंडूंची ओव्हर, पाहा Video

AFG vs ZIM: नवीन उल हकने या सामन्यात आपल्या एका ओव्हरमध्ये 13 बॉल टाकले. या 13 पैकी 6 चेंडू वाईड आणि 1 नो बॉल होता. नवीनने सलग चार वाईड बॉल टाकले.

Surabhi Jayashree Jagdish

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात सध्या टी-२० सिरीज खेळवण्यात येतेय. या तीन सामन्यांच्या सिरीजमधील पहिला सामना बुधवारी हरारेमध्ये खेळवला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानला हरवून मोठा उलटफेर केला. हा सामना खूपच रोमांचक होता.

दरम्यान या सामन्यात अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हकची अधिक चर्चा होतेय. झिम्बाब्वेच्या डावात अफगाण गोलंदाज नवीन उल हकने असं काही केलं की चाहते पुरते हैराण झाले होते. नवीन उल हकने या सामन्यात आपल्या एका ओव्हरमध्ये 13 बॉल टाकले. या 13 पैकी 6 चेंडू वाईड आणि 1 नो बॉल होता. नवीनने सलग चार वाईड बॉल टाकले. दरम्यान त्याच्या या ओव्हरचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.

झिम्बाब्वेच्या डावाच्या १५व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. या ओव्हरपूर्वी सामना अफगाणिस्तानच्या हातात होता. नवीन उल हकने वाइड बॉलने ओव्हरची सुरुवात केली. यानंतर त्याने पहिल्या बॉलवर एक रन दिला.

यानंतर दुसऱ्या बॉलवर नो बॉल आणि चौकार लगावण्यात आली. यानंतर फ्री हिट टाळण्यासाठी नवीनला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकायचा होता. पण यावेळी त्याने 1-2 नाही तर सलग चार बॉल वाईड टाकले.

यानंतरही अधिकृत फ्री हिटवर सिकंदरने फोर मारला. म्हणजेच या एका ओव्हरमध्ये नवीनने तब्बल १३ रन्स दिले.

यानंतर नवीन पुन्हा १९ वी ओव्हर टाकण्यासाठी षटक फेकण्यासाठी आला आणि झिम्बाब्वेला तेव्हा २ ओव्हर्समध्ये २१ रन्सची गरज होती. नवीनने त्या ओव्हरमध्ये १० रन्स दिले. यानंतर अझमतुल्लाह ओमारझाई गोलंदाजीला आला आणि झिम्बाब्वेला ११ रन्सची गरज होती. तशिंगा मुसेकिवाने उत्तम फटकेबाजी करत झिम्बाब्वेला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

SCROLL FOR NEXT