major dhyanchand  saam tv
Sports

National Sports Day: भारतासाठी हिटलरच्या ऑफरला नकार देणारा देशभक्त! वाचा हॉकीच्या जादुगारचा भन्नाट किस्सा

Major Dhyan Chand Birthday Special : वाचा मेजर ध्यानचंद यांचा भन्नाट किस्सा.

Ankush Dhavre

Major Dhyan Chand Facts:

१५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे हे सर्वांना माहित आहे. परंतु याच दिवशी घडलेल्या एका घटनेबद्दल ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल.

तर हा किस्सा आहे जर्मन हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरचा आणि त्याचा गर्व उतरविणाऱ्या आणि भारताला हॉकीमध्ये सुर्वणकाळ दाखविणाऱ्या एका अवलियाचा.

तर १९२८, १९३२ आणि १९३६ अशा लागोपाठ तिन्ही ऑलिम्पिकमध्ये भारताने सुवर्णपदके जिंकली होती. मात्र १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये पोचलेल्या भारताची गाठ घरच्या मैदानावर खेळणाऱ्या जर्मनीशी होती.

या सामन्यासाठी खुद्द जर्मनीचा हुकूमशाह हिटलरदेखील हजर होता. मात्र असे असतानादेखील कोणत्याही दडपणाखाली न खेळता ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली.

मेजर ध्यानचंद यांचा खेळ पाहून हिटलरला खुप आनंद झाला होता. हिटलरची अशी इच्छा होती की, मेजर ध्यानचंद यांनी जर्मनीच्या लष्करात भरती व्हावे.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर हिटलरने मेजर ध्यानचंद यांना जर्मनीच्या नागरिकत्वाची ऑफर देखील दिली होती. मात्र भारतासाठी खेळणाऱ्या मेजर ध्यानचंद यांनी या हिटलरला थेट नकार दिला होता.

भारतीय लष्करात लान्स नायक या कनिष्ठ पदावर असणाऱ्या ध्यानचंद यांनी हिटलरची जर्मनीच्या सैन्यदलात कर्नलपदाची ऑफर धुडकावली होती. मात्र अशा या हॉकीच्या जादूगाराला आजपर्यंत भारतरत्न मिळाला नाही आहे. (Latest sports updates)

मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार का म्हटले जायचे?

मेजर ध्यानचंद यांचा खेळ इतका अप्रतिम होता की, जसे क्रिकेटपटू फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडतात त्याचप्रमाणे मेजर ध्यानचंद एकापाठोपाठ गोल करायचे. त्यांचा खेळ पाहून सर्वच चक्रावून गेले होते.

अनेकांना असं वाटू लागलं होतं की, त्यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबक आहे. त्यामुळे नेदरलँडमध्ये त्यच्या स्टिकची चौकशी देखील करण्यात आली होती.

पण चौकशीनंतर त्यांच्या स्टिकमध्ये कुठलंही चुंबक नसल्याचं समोर आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT