World Cup 2023: वर्ल्डकपसाठी 'या' दिवशी होणार टीम इंडियाची घोषणा! कोणाला मिळणार संधी?

Team India Squad For World Cup 2023: वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Team India Squad For World Cup 2023
Team India Squad For World Cup 2023saam tv
Published On

ICC ODI World Cup 2023 Team India Squad Announcement:

पाकिस्तान आणि श्रीलंकेत आशिया चषक २०२३ स्पर्धेचा थरार रंगणार आहे.. स्पर्धेतील पहिला सामना ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरुद्ध नेपाळ या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध रंगणार आहे.

या सामन्यानंतर बीसीसीआय आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते.

माध्यमातील वृत्तानुसार बीसीसीआय येत्या ३ सप्टेंबर रोजी संघाची घोषणा करणार आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

Team India Squad For World Cup 2023
Asia Cup 2023, Live Streaming: केव्हा आणि कुठे रंगणार आशिया चषकातील सामने? फ्री लाईव्ह स्ट्रिमिंग अन् सामन्याची वेळ;जाणून घ्या

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार ३ सप्टेंबर रोजी वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा होऊ शकते. कारण २ सप्टेंबर रोजी भारतीय संघ पाकिस्तान संघासोबत दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

हा सामना वर्ल्डकपच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात जो चांगली कामगिरी करेल त्याचं भारतीय संघातील स्थान जवळ जवळ निश्चित आहे.

आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी २८ सप्टेंबरपर्यंत संघाची घोषणा करण्याची मुदत आहे. वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर खेळवण्यात येत असलेल्या आशिया चषकात भारतीय संघ भारतीय संघ मजबूत प्लेइंग ११ सह मैदानात उतरणार आहे.

या स्पर्धेसाठी दुखापतीतून कमबॅक करत असलेल्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यरला देखील संघात स्थान देण्यात आले आहे.

जर हे दोघेही खेळाडू फिट असतील, तर दोघांचा वर्ल्डकपसाठी विचार केला जाऊ शकतो.

संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजाला स्थान दिले जाऊ शकते. तर युवा सलामीवीर शुभमन गिलसह, तिलक वर्माची देखील संघात वर्णी लागू शकते. (Latest sports updates)

Team India Squad For World Cup 2023
Asia Cup 2023: टीम इंडियासाठी गुड न्यूज!पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट; केएल राहुल खेळणार का?

भारतात रंगणार वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार..

आगमी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धचा थरार भारतात रंगणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना येत्या ५ ऑक्टोबरपासून रंगणार आहे. या स्पर्धेची सुरूवात इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड या सामन्याने होणार आहे.

तर भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया संघासोबत रंगणार आहे. तर भारत विरूद्ध पाकिस्तान हा हाय व्हॉल्टेज सामना येत्या १४ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com