australia team saam tv
Sports

Ashes 2023: सामना जिंकताच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! संघातील मॅचविनर खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर

Nathan Lyon Ruled Out: दुसरा सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे

Ankush Dhavre

Nathan Lyon Injury: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये मानाची समजली जाणारी अॅशेस मालिका सुरु आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीचे २ सामने पार पडले आहेत. हे २ सामने जिंकून ऑस्ट्रेलियाने २-० ची आघाडी घेतली आहे. मात्र दुसरा सामना झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.

ऑस्ट्रेलियासाठी सलग १०० कसोटी सामने खेळणारा गोलंदाज नॅथन लायन अॅशेस मालिकेतून बाहेर पडला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. तो मालिकेतून बाहेर होण्याची बातमी समोर आली होती. मात्र आता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

नॅथन लायन संपूर्ण मालिकेतून बाहेर..

नॅथन लायन पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान तो गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे तो गोलंदाजी करायला येऊ शकला नव्हता.

मात्र तो फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याला सरळ उभं राहता येत नव्हतं. असं असताना देखील त्याने मिचेल स्टार्कसोबत १५ धावांची भागीदारी केली. हा नॅथन लायनच्या कसोटी कारकिर्दीतील सलग १०० वा सामना होता.

कसोटी क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू..

अॅलिस्टर कुक -१५९

अॅलेन बॉर्डर- १५३ सामने,

मार्क वॉ १०७ सामने

सुनील गावसकर - १०६ सामने

ब्रॅंडन मॅक्क्युलम १०१ सामने

नॅथन लायन- १०० सामने (Latest sports updates)

६ जुलैपासून रंगणार तिसरा कसोटी सामना..

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ६ जुलैपासून रंगणार आहे. हा कसोटी सामना हेडींग्लेच्या मैदानावर रंगणार आहे. नॅथन लायन बाहेर झाल्यास टॉड मर्फीला संधी दिली जाऊ शकते.

भारतीय संघाने जेव्हा भारत दौरा केला होता. त्यावेळी टॉड मर्फीला ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले गेले होते. या मालिकेत त्याने जोरदार कामगिरी केली होती. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने १४ गडी बाद केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरांटो प्रकल्पाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

Monday Horoscope : या 7 राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात होणार मोठा बदल; वाचा सोमवारचं राशीभविष्य

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT