natasa stankovik yandex
Sports

Natasa Stankovik: घटस्फोटानंतर परदेशी निघून गेलेल्या नताशाने शेअर केला पहिला व्हिडिओ- VIDEO

Natasa Stankovik Instagram Story: घटस्फोट झाल्यानंतर नताशा स्टानकोविकने पहिला व्हिडिओ शेअर केला आहे, जो तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारताचा स्टार खेळाडू हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविक या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र दोघांनी कुठलीच माहिती दिली नव्हती. अखेर गुरुवारी हार्दिक पंड्याने या चर्चांना पूर्णविराम दिला. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती.ज्यात त्याने नताशाला घटस्फोट दिला असल्याची माहिती दिली. ४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान घटस्फोट झाल्यानंतर नताशाने शेअर केलेली इंस्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरतेय.

natasa stankovik

नताशाने हार्दिकची साथ सोडली असून, ती आपला मुलगा अगस्त्यला घेऊन आपल्या आईच्या घरी परतली आहे. गुरुवारी अगस्त्यचा वाढदिवस होता. त्याला शुभेच्छा देणारी स्टोरी तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली होती. दोघेही सर्बियामध्ये आहेत.

नताशाची स्टोरी व्हायरल

घटस्फोट झाल्यानंतर नताशाने पहिल्यांदाच स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिचा मुलगा अगस्त्य गार्डनमध्ये चेंडूसोबत खेळताना दिसून येत आहे. तुम्ही पाहू शकता की, खेळता खेळता चेंडू झाडांमध्ये जातो, त्यानंतर तो चेंडू शोधताना दिसून येत आहे. त्यावेळी व्हिडिओ शेअर करत असताना नताशा अगस्त्यला विचारते, तुला काही लागलं का? त्यावेळी अगस्त्य तिला उत्तर देत नाही असा म्हणतो.

हार्दिकने पोस्ट शेअर करत दिली माहिती

हार्दिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत, घटस्फोट झाल्याची माहिती दिली. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ' ४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर आम्ही दोघांच्या सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही हे नातं टिकविण्याचा भरपूर प्रयत्न केला. हा निर्णय घेण्यासाठी आमच्यासाठी सोपं नव्हतं. अगस्त्य आमच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असेल. आम्ही दोघं मिळून त्याचा सांभाळ करु. आम्ही आशा करतो की, आम्हाला तुमचा पाठींबा मिळेल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

SCROLL FOR NEXT