musheer khan  twitter
Sports

Musheer Khan Helicopter Shot: मुशीरचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट पाहिलात का? Video होतोय व्हायरल

Musheer Khan Batting: भारताच्या अंडर १९ संघातील फलंदाज मुशीर खानने हेलिकॉप्टर शॉट मारला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Musheer Khan Helicopter Shot:

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ६ फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने होते. हा सामन्यात खेळाडूंनी दमदार खेळ करून न्यूझीलंडला २१४ धावांनी धूळ चारली आहे.

भारतीय संघाकडून मुशीर खान चमकला. त्याने पहिल्या डावात फलंदाजी करताना १३१ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने हेलिकॉप्टर शॉट मारला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा सामना मेनगॉन्ग ओव्हलच्या मैदानावर पार पडला. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. या खेळपट्टीवर फलंदाजी करताना मुशीरने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.

त्याने या सामन्यात १२६ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १३१ धावा चोपल्या. यासह त्याने या स्पर्धेत ३०० धावांचा पल्ला गाठला आहे. यापूर्वी आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने शतकी खेळी केली होती.

मुशीरचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट..

भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना मुशीरने ४६ व्या षटकात हेलिकॉप्टर शॉट मारला जो पाहून तुम्हालाही धोनीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. गोलंदाजाने यॉर्कर चेंडू टाकला. या चेंडूवर मुशीरने वेगाने बॅट फिरवत चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहचवला. त्याच्या या शॉटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Latest cricket news in marathi)

मुशीरच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद..

मुशीरने या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. यापूर्वी आयर्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने तुफानी शतक झळकावलं होतं. तर न्यूझीलंडविरुद्ध झळकावलेलं शतक हे त्याचं या स्पर्धेतील सलग दुसरं शतक ठरलं आहे. यासह तो या स्पर्धेत २ शतकं झळकावणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी शिखर धवनने २००४ अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत ३ शतकं झळकावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT