mumbai ranji team twitter
Sports

Mumbai vs J&K: रोहित ३, यशस्वी ४, अय्यर ११.. घरच्या मैदानावर जम्मू काश्मीरच्या गोलंदाजांनी मुंबईकरांना फोडला घाम

Mumbai vs Jammu & Kashmir, Ranji Trophy: रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातील सामना मुंबईत सुरु आहे. या सामन्यात मुंबईचे फलंदाज फ्लॉप ठरले आहेत.

Ankush Dhavre

रणची ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर मुंबई विरुद्ध जम्मू आणि काश्मीर असा सामना सुरु आहे. या सामन्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे, रोहित शर्मा मुंबई संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. एकटा रोहित नव्हे, तर यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे आणि श्रेयस अय्यरसारखे स्टार खेळाडू देखील मुंबईकडून रणजी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

मुंबईची फ्लॉप सुरुवात

या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल. या निर्णयामुळे सर्वांनाच आनंद झाला. कारण रोहित शर्माला लाईव्ह खेळताना पाहण्याची संधी मिळणार होती. तब्बल १० वर्षानंतर रोहित शर्मा रणजी ट्रॉफी खेळायला मैदानात उतरला. रोहितने यशस्वीसह डावाची सुरुवात केली. पण दोघांनाही हवी तशी सुरुवात करता आली नाही.

सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी शानदार चौकार मारला. पण त्यानंतर त्याला पायचित होऊन माघारी परतावं लागलं. जयस्वाल पाठोपाठ रोहितने ३ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली. हे मुंबईचं होमग्राऊंड आहे. पण होमग्राऊंडवरच मुंबईच्या फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.

रोहितनंतर हार्दिक तामोरे ७, अजिंक्य रहाणे १२, शिवम दुबे ० आणि शम्स मुलानी देखील शून्यावर माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर ११ धावांव तंबूत परतला. मुंबईने अवघ्या ४२ धावांवर ६ गडी गमावले. जम्मू आणि काश्मीरकडून गोलंदाजी करताना उमरने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर नबीने १ आणि युद्वीर सिंगने २ गडी बाद केले.

या सामन्यासाठी अशी आहे मुंबईची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शिवम दुबे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, मोहित आवस्थी, कार्श कोठारी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT