ajinkya rahane twitter
Sports

Ajinkya Rahane,Ranji Trophy: अजिंक्य रहाणेचं दमदार शतक! ४१ व्या वेळेस केला असा कारनामा

Ajinkya Rahen Century In Ranji Trophy Quarterfinal: मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेची बॅट हरियाणाविरुद्धच्या सामन्यात चांगलीच तळपली आहे. या सामन्यात त्याने शतकी खेळी केली आहे.

Ankush Dhavre

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे. गतविजेत्या मुंबईचा सामना हरियाणाविरुद्ध सुरु आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेची बॅट चांगलीच तळपली.

या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने शतक पूर्ण केलं. रहाणेने १६० चेंडूंचा सामना करत १२ चौकार खेचत शतकी खेळी केली आणि मुंबईला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे. या शानदार शतकी खेळीच्या बळावर मुंबईने ३०० पार धावांची आघाडी घेतली आहे.

मुंबईची फ्लॉप सुरुवात

या सामन्यातील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मुंबईला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. अवघ्या ५० धावांच्या आत मुंबईचे २ फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर मुंबईचा संघ शंभरी गाठणार इतक्यात तिसरा फलंदाजही तंबूत परतला. त्यानंतर रहणे फलंदाजीला आला आणि त्याने मुंबईचा डाव सावरला. रहाणेला डाव सावरण्यात शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांनी मदत केली.

रहाणेचं दमदार शतक

रहाणे आणि सूर्यकुमार यांची जोडी चांगलीच जमली. दोघांनी हरियाणाच्या गोलंदाजांचा समाचार घेत चौथ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार बाद होऊन माघारी परतल्यानंतर रहाणेने दुबेसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान त्याने आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ४१ वे शतक पूर्ण केले. तर सूर्यकुमारच्या खेळीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ८६ चेंडूंचा सामना करत ७० धावांची खेळी केली.

रहाणेचं शतक, मुंबई मजबूत स्थितीत

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबईने ३१५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हरियाणाला ३०१ धावा करता आल्या. यासह मुंबईने पहिल्या डावात १४ धावांनी आघाडी घेतली. आता दुसऱ्या डावात फलंदाजी करताना मुंबईचा संघ ३५० हून अधिक धावांनी आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT