team india twitter
Sports

World Cup Semi Final: मुंबई की कोलकाता? टीम इंडियाचा वर्ल्डकप सेमीफायनलचा सामना कुठे रंगणार? वाचा सविस्तर

World Cup Semi Final Venue: भारतीय संघ वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सामना कुठे खेळणार?

Ankush Dhavre

World Cup Semi Final Venue Update:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये जाणारे ३ संघ ठरले आहेत. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाने सेमीफायलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या संघासोबत रंगणार आहे.

ठरलेल्या वेळापत्रकानुसार सेमीफायनलचा पहिला सामना १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र पाकिस्तानने जर सेमीफायनलमध्ये प्रवेश केला तर सेमीफायनलचं ठीकाण बदलण्यात येणार आहे. जाणून घ्या काय आहे यामागचं कारण.

न्यूझीलंडने जर सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना ठरलेल्या वेळापत्रकानुसार १५ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.

तर सेमीफायनलचा दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना १६ नोव्हेंबर रोजी कोलकाताच्या ईडन गार्डनवर खेळवण्यात येईल. मात्र जर पाकिस्तानने वर्ल्डकपच्या सेमीफायनलं तिकीट बदलण्यात येईल.

जर पाकिस्तानने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तर मुंबईत होणारा सामना हा कोलकात्यात खेळवला जाईल. यामागचं प्रमुख कारण असं की, २००८ मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला करण्यात आला होता.

या हल्ल्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा हात असल्याचं समोर आलं होतं. या हल्ल्यानंतर भारत -पाकिस्तान द्विपक्षीय मालिकांवर बंदी घालण्यात आली होती.

तसेच पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यावरही बंदी आणली गेली होती. हे पाहता बीसीसीआय आणि आयसीसीने पाकिस्तानचा सेमीफायनलचा सामना कोलकात्यात खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest sports updates)

भारत,दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलच्या फेरीच आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसाठी चुरशीची लढत सुरु आहे. न्यूझीलंडचा संघ सेमीफायनमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT