Rupay Prime Volleyball League saam tv news
Sports

Rupay Prime Volleyball League: तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेत मुंबई मेटीयॉर्सचा अहमदाबाद डिफेंडर्सवर महत्वपूर्ण विजय

Rupay Prime Volleyball League: चुरशीच्या लढतीत मुंबई मेटीयॉर्स संघाने अहमदाबाद डिफेंडर्स संघावर 15-8, 13-15, 7-15, 16-14, 15-13 असा विजय मिळवत महत्वपूर्ण निकालाची नोंद केली.

Ankush Dhavre

Rupay Prime Volleyball League:

तिसऱ्या रूपे प्राईम व्हॉलिबॉल लीग स्पर्धेत सुपर फाईव्ह फेरीत पाच सेटच्या चुरशीच्या लढतीत मुंबई मेटीयॉर्स संघाने अहमदाबाद डिफेंडर्स संघावर 15-8, 13-15, 7-15, 16-14, 15-13 असा विजय मिळवत महत्वपूर्ण निकालाची नोंद केली.

ए 23प्रायोजित ही स्पर्धा जवाहरलाल नेहरू इंडोर स्टेडियम येथे पार पडला. या सामन्यात अमित गुलिया सामन्याचा मानकरी ठरला.

त्याआधी अहमदाबादचा अव्वल बचावपटू शिखर सिंगला निष्प्रभ करण्यासाठी मुंबई च्या अमित आणि शुभम यांनी सलग आक्रमण सुरू केले. टाळता येण्यासारख्या चुका केल्यामुळे आणि प्रमुख खेळाडू मुथु ऐवजी बदली खेळाडू घेण्याचा निर्णय चुकल्यामुळे पिछाडीवर पडलेल्या अहमदाबादवर वर्चस्व गाजवत मुंबई संघाने पहिला सेट जिंकला.

मुथु स्वामी आणि आंगा मुथू मैदानावर परतल्याने मजबूत झालेल्या अहमदाबादच्या बचाव फळीने मुंबईचे आक्रमण निष्प्रभ ठरवले. शॉन टी जॉन याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे अहमदाबादने सलग दोन सेट जिंकत सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली. (Sports news in marathi)

शिखर आणि इलिया यांनी आटोकाट प्रयत्न करूनही अमित च्या जोरदार आक्रमणामुळे मुंबई संघाने चौथा सेट जिंकून बरोबरी साधली. सुर गवसलेल्या अमितने पाचव्या सेट मध्ये अहमदाबादच्या उंचा पुऱ्या बचावपटूना चकवून मुंबईला वर्चस्व मिळवून दिले. अखेरच्या टप्प्यात आंगा मुथू चे आक्रमण आणि मॅक्स सेनिका याच्या सुपर सर्व्ह मुळे अहमदाबाद संघाने विजयाकडे वाटचाल केली होती. परंतु आदित्यच्या अफलातून बचावामुळे मुंबई संघाने अखेरच्या क्षणी बाजी मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : धाराशिवमध्ये जय मल्हार तरुण मंडळाने डीजेला बगल देत पारंपारिक पोतराज नृत्य सादर करत आपल्या बाप्पाची काढली मिरवणूक

Mumbai Bomb Threat: मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमागची इनसाइड स्टोरी खतरनाक, सगळेच चक्रावून गेले

Mumbai Best Bus : मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बातमी! काळाघोडा ते ओशिवरा प्रवास फक्त ५० रुपयांत

Maharashtra Live News Update: उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट

म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांत घर; नाशिकच्या प्राईम लोकेशनवर स्वप्नांचं घर मिळणार

SCROLL FOR NEXT