MI vs UPW Highlights Twitter/wpl
Sports

MI vs UPW Highlights : इस्सी वोंगने यूपी वॉरियर्सची उडवली दाणादाण; मुंबई इंडियन्सने 72 धावांनी जिंकला सामना

मात्र, मुंबईच्या भेदक माऱ्यापुढे यूपीचा संपूर्ण संघ ११० धावांवर तंबूत परतला.

Vishal Gangurde

MI VS UP Match News : वुमेन्स प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यात युपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने यूपीला १८३ धावांचे आव्हान दिले. मात्र, मुंबईच्या भेदक माऱ्यापुढे यूपीचा संपूर्ण संघ ११० धावांवर तंबूत परतला. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा संघ तब्बल ७२ धावांनी जिंकला. मुंबईने हा सामना जिंकल्यामुळे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

एलिमिनेटर सामन्यात यूपी वॉरियरर्सला जिंकण्यासाठी १८३ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र, यूपी वॉरियर्सचा संघ ११० धावांवर गारद झाला. यूपी वॉरियर्सच्या किरण नवगिरेने संघासाठी सर्वाधिक ४३ धावा कुटल्या. मुंबईला हा सामना जिंकून देण्यासाठी ईस्सी वोंगने महत्वाची भूमिका निभावली. (Latest Sports News)

इस्सीने १३ व्या षटकात किरण नवगिरे, सिमरन शेख आणि सोफी एक्स्लेस्टोनला बाद केले. इस्सीने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेतली आहे. या व्यतिरिक्त अष्टपैली नेट साइवर-ब्रंटने मुंबईसाठी ७२ धावा कुटल्या.

नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या मुंबईची सुरुवात खराब झाली. मुंबईकडून खेळताना यास्तिका भाटिया २१ धावांवर प्रथम बाद झाली. त्यानंतर पार्श्वी चोपडा २६ धावांवर बाद झाली. तर हरमनप्रीत आणि साइवरने काही प्रमाणात संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. हरमनप्रीत १४ धावांवर तंबूत परतली. मुंबईच्या संघातील फलंदाजांनी यूपी वॉरिर्यसाठी १८२ धावांसाठी आव्हान दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morcha: रिक्षा- कॅब चालकांचा मुंबईत एल्गार! आझाद मैदानावर धडक मोर्चा; काय आहेत प्रमुख मागण्या?

Sabudhana Khichdi: रोजची साबुदाणा खिचडी होईल आणखी टेस्टी, फक्त वापरा 'हा' पदार्थ

Maharashtra Live News Update: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांच निधन

भयंकर! शायनिंग मारायला गेला अन् ट्रेनच्या खाली चिरडला, २ किमीपर्यंत फरफटत गेला, पण... व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल

India First Car: भारतात पहिली कार कधी आली? जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT