MI IPL 2026 opener win saam tv
Sports

IPL 2026: रोहित-रिकेल्टनचं तुफान आणि बुमराह-शार्दूलची जादू; या ५ कारणांमुळे मुंबईचा दणदणीत विजय

MI IPL 2026 opener win: मुंबई इंडियन्सने 13 वर्षांनंतर आयपीएलचा पहिला सामना जिंकत केकेआरचा 6 विकेट्सने पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या विजयाची काय कारणं आहेत ती पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

तब्बल १३ वर्षांनी मुंबईने आयपीएलच्या स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आणि चाहत्यांना खूश केले. रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगलेल्या सामन्यात मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सचा ६ विकेट्सने पराभव केला. २०१२ नंतर पहिल्यांदा मुंबईने पहिला सामना जिंकला. मुंबईच्या या पहिल्या सामना जिंकण्याची काय कारणं आहेत ते पाहूयात.

रोहित शर्माची तुफान फलंदाजी

रविवारचा सामना मुंबईत होता आणि सर्वांची नजर रोहित शर्मावर होती. रोहितनेही चाहत्यांना नाराज न करता वानखेडेच्या मैदानावर तुफान फलंदाजी केली. केकेआरने मुंबईसमोर २२१ रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रोहित मैदानात आला आणि त्याने केकेआरच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. २८ चेंडूंमध्ये ७८ रन्स करत त्याने मुंबईच्या टीमला एक चांगली सुरुवात करून दिली.

रिकेल्टनची चांगली सुरुवात

मुंबईने पहिल्या सामन्यात क्विंटन डिकॉकच्या जागी रायन रिकेल्टनला संधी दिली होती. यावेळी रिकेल्टननेही रोहित शर्मासोबत ओपनिंग करताना तुफान खेळी केली. रिकेल्टनने ४३ चेंडूंमध्ये ८१ रन्सची खेळी केली. रोहितची विकेट गेल्यानंतरही त्याने आक्रमक पद्धतीने फलंदाजी केली.

बुमराहचा अनुभव आला कामी

जेव्हा वानखेडेच्या मैदानावर केकेआरची टीम फलंदाजी करण्यासाठी उतरली तेव्हा आरामात २५० रन्सच्या पार स्कोर जाईल असं सर्वांना वाटत होतं. मात्र मुंबईकडून बुमराह मैदानात उतरला आणि केकेआरचा हा स्कोर होऊ शकला नाही. यावेळी बुमराहने केवळ ४ ओव्हर्समध्ये ३५ रन्स खर्च केले.

लॉर्ड शार्दुलची घातक गोलंदाजी

हा सिझन सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने शार्दुलला आपल्या ताफ्यात घेतलं. यावेळी पहिल्याच सामन्यात शार्दुलने त्याची जादू दाखवली. रहाणे आणि फिन एलन तुफान फलंदाजी करत असताना त्यांची जोडी शार्दुलने मोडली. यावेळी त्याने ३९ रन्स देऊन ३ विकेट्सही काढले.

मुंबईच्या खेळाडूंचा इंटेट

केकेआरने मुंबईला विजयासाठी २२१ रन्सचं आव्हान दिलं होतं. मात्र वानखेडेच्या मैदानावर हे आव्हान सहजपणे पार होऊ शकतं याची खेळाडूंना खात्री होती. सुरुवातीपासून मुंबईच्या खेळाडूंनी उत्तम शॉर्ट खेळून चांगला इंटेट दाखवला. अखेरीस मुंबईने ६ विकेट्सने हा सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Vinod Kambli: मुंबईतल्या पॉश एरियात आलिशान घर, तरीही विनोद कांबळी वृद्धाश्रमात का राहतो?

Kidney disease symptoms: किडनी फेल होण्यापूर्वी शरीर देतं ५ इशारे; साध्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे पडेल भारी

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

SCROLL FOR NEXT