Mumbai Indians vs Delhi Capitals : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा ४३ वा सामना झाला. या सामन्यात दिल्लीने १० धावांनी विजय मिळवत मुंबईकडून मिळालेल्या पराभवाचा बदला घेतला. दिल्ली कॅपिटल्स संघाचे फलंदाज जॅक फ्रेझर मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होपने एमआयच्या गोलंदाजांचा समाचार घेत मोठी धावसंख्या उभारली. दिल्लीने दिलेल्या २५८ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाची सुरुवात खराब राहिली. पावरप्लेमध्येच मुंबईच्या संघाने आपले टॉप ३ गडी गमावले, याचा भुर्दंड म्हणून आणखी एक पराभव हाती आला. एमआयचा संघ २० षटकात ७ विकेट गमावत २४७ धावा करू शकला.
मुंबईकडून फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि इशान किशन, सूर्यकुमार यादव अपयशी ठरलेत. त्यानंतर कर्णधार हार्दिकने उत्तम खेळी केली. हार्दिकने २४ चेंडूत ४६ धावांची जबरदस्त खेळी केली. त्यानंतर तिलक वर्माने ३२ चेंडूचा सामना करत ६३ धावा केल्या यात ४ चौकार आणि ४ षटकाराचा समावेश आहे. तर हार्दिकने २४ चेंडूचा सामना करत ४६ धावा केल्या. यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. तिलक वर्मा मैदानावर असेपर्यंत मुंबईने आपल्या चौथ्या विजयाची आस लावून धरली होती.
पण एका सुमित कुमारच्या गोलंदाजीवर एक अतिरिक्त धाव घेताना तिलक धाव बाद झाला. त्यानंतर मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. अतिरिक्त धाव घेताना बाद झालेल्यानंतर तिलक वर्मा निराश होत तंबूत परतला. आपण संघाला विजय मिळवून देऊ शकलो असतो. पण अतिरिक्त धावने घात झाल्याचा भाव ठेवत तो स्वत:वर नाराज झालेला दिसला. दिल्लीकडून गोलंदाजी करताना खलील अहमदने २ विकेट घेतल्या. तर मुकेश कुमारने ५९ धावा देत ३ विकेट घेतल्या. त्यानंतर राशीख दर सलामने ४ षटक टाकत ३४ धावा दिल्या आणि ४ विकेट्स घेतल्या.
जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या २७ चेंडूत ८४ धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट गमावत २५७ धावा केल्या. दिल्लीच्या सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. ट्रिस्टन स्टब्सने २५ चेंडूत नाबाद ४८ धावा, शाई होपने १७ चेंडूत ४१ आणि अभिषेक पोरेलने २७ चेंडूत ३६ धावा केल्या. या फलंदाजांच्या जोरावर दिल्लीने मुंबईसमोर २५७ धावांचे आव्हान ठेवलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.