IPL 2026 Playoff Race saam tv
Sports

IPL 2026: मुंबईने पंजाबचा खेळ बिघडवला! आता प्लेऑफचं समीकरण काय? कुणाला किती संधी? वाचा नेमकं गणित

IPL 2026 Playoff Race: आयपीएल 2026 च्या प्लेऑफ शर्यतीत गुजरात टायटन्स आणि आरसीबी जवळपास पात्र ठरले आहेत. चेन्नई, राजस्थान आणि पंजाबमध्ये जोरदार स्पर्धा सुरू असून कोलकाता आणि दिल्लीच्या आशा जवळपास संपल्या आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल 2026 च्या प्लेऑफची शर्यत आता अतिशय रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे. लीग फेरीतील अवघे 12 सामने बाकी असताना काही टीम्सचं भविष्य जवळपास स्पष्ट झालंय. तर काही टीम अजूनही दुसऱ्यांच्या आशेवर टिकून आहेत. प्रत्येक सामन्यानंतर पॉईंट्स टेबलचं चित्र बदलत असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, लखनऊ आणि मुंबई इंडियन्स यांचं प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. दुसरीकडे गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांनी जवळपास प्लेऑफचं तिकीट निश्चित केलंय. गुजरातकडे पॉईंट्स टेबलच्या टॉप ४ मध्ये टॉप चारमध्ये राहण्याची तब्बल 99.9 टक्के शक्यता आहे. इतकंच नाही तर पहिल्या दोन स्थानांमध्ये राहण्याची त्यांची शक्यता 79.1 टक्के आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू

आरसीबीचंही चित्र जवळपास तसंच आहे. बंगळुरू संघाला टॉप-4 मध्ये स्थान मिळण्याची 99.3 टक्के शक्यता आहे, तर पहिल्या दोन संघांमध्ये राहण्याची त्यांची शक्यता 81.9 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

सनरायझर्स हैदराबाद

सनरायझर्स हैदराबाद टीमनेही दमदार कामगिरी केलीये. त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्याची 79.7 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर टॉप-2 मध्ये पोहोचण्याची त्यांची शक्यता 36 टक्के आहे.

पंजाब किंग्स

पंजाब किंग्ससाठी गुरुवारी झालेला पराभव मोठा धक्का ठरला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पराभवानंतर पंजाबच्या प्लेऑफच्या शक्यता कमी झाल्या आहेत. आता त्यांच्याकडे टॉप-4 मध्ये पोहोचण्याची फक्त 43.8 टक्के शक्यता उरलीये.

चेन्नई सुपर किंग्ज

चेन्नई सुपर किंग्ज अजूनही स्पर्धेत मजबूतपणे टिकून आहे. चेन्नईला टॉप-4 मध्ये पोहोचण्याची 56.3 टक्के शक्यता आहे. तर टॉप २ मध्ये पोहोचण्याची त्यांची शक्यता 22.2 टक्के इतकीच आहे.

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्स कडेही चांगली संधी आहे. राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची 57 टक्के शक्यता आहे, तर टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्याची शक्यता 17.9 टक्के आहे.

राजस्थान रॉयल्स

कोलकात्यासाठी मात्र परिस्थिती अत्यंत कठीण झाली आहे. कोलकात्याला टॉप ४ मध्ये पोहोचण्याची शक्यता केवळ 3.7 टक्के राहिली आहे. विशेष म्हणजे आता ते पॉईंट्स टेबलच्या पहिल्या दोन स्थानांसाठी स्पर्धा करू शकत नाहीत.

दिल्ली कॅपिट्ल्स

दिल्ली कॅपिट्ल्सची अवस्था देखील फारशी चांगली नाही. दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा आता फक्त 4.2 टक्क्यांवर येऊन ठेपल्या आहेत. ते जास्तीत जास्त चौथ्या स्थानासाठी स्पर्धा करू शकतात.

या सर्व शक्यता कशा ठरवल्या गेल्या याकडे पाहिल्यास, अजून 12 सामने बाकी असल्यामुळे एकूण 4,096 वेगवेगळे निकाल शक्य आहेत. प्रत्येक संघ किती वेळा टॉप-4 किंवा टॉप-2 मध्ये पोहोचतो याचा अभ्यास करून ही टक्केवारी काढण्यात आली आहे.

एकूणच, आयपीएलच्या प्लेऑफची लढत आता अत्यंत रोमांचक बनली असून पुढील काही सामने अनेक टीमचं भवितव्य ठरवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत वंचितकडून उमेदवारी कायम

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

'नीट'ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही; तरुणी विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

शेतकरी कर्जमाफीनंतर राज्य सरकारनं पशुपालक, कुक्कुटपालकांसाठी घेतला मोठा निर्णय,बळीराजाला आले 'अच्छे दिन'

सामच्या बातमीचा इम्पॅक्ट: नीट पेपरफुटीनंतर त्या इंटिग्रेटेड महाविद्यालयांवर होणार कारवाई, शिक्षण विभागाचे आदेश

SCROLL FOR NEXT