MI team saam tv
Sports

Mumbai Indians new jersey: मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच? लूक पाहून चाहते संतापले, पाहा काय आहे प्रकरण

Mumbai Indians new jersey viral picture: बऱ्याच वेळा चाहत्यांना फ्रँचायझीने केलेल्या गोष्टी आवडत नाहीत. यावेळी चाहते त्यांची नाराजी सर्रासपणे व्यक्त करतात. अशीच एक घटना नुकतीच घडली.

Surabhi Jayashree Jagdish

संपूर्ण देशात मुंबई इंडियन्सचे चाहते आहेत. याशिवाय देशाच्या बाहेरही त्यांचे चाहते आहेत. ही फ्रँचायझी देखील चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर काही ना काही एक्टिव्हीटी करत असते. काहीवेळा चाहत्यांना त्यांनी केलेल्या गोष्टी आवडतात. मात्र याच्या उटलही काही गोष्टी घडू शकतात.

बऱ्याच वेळा चाहत्यांना फ्रँचायझीने केलेल्या गोष्टी आवडत नाहीत. यावेळी चाहते त्यांची नाराजी सर्रासपणे व्यक्त करतात. अशीच एक घटना नुकतीच घडली.

गुरुवारी 12 डिसेंबर रोजी मुंबई इंडियन्सने येत्या सीजनसाठी त्यांची नवी जर्सी लाँच केल्याची माहिती होती. या इव्हेंटमध्ये असलेल्या जर्सीवर नेहमीप्रमाणे निळ्या रंगाची असून त्यावर गोल्डन रंगाच्या रेषा आहेत. मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर आयडीएफसी बँकेचा आणि लॉरिट्झ नुडसेन यांचा लोगो आहे. तर डाव्या बाजूला मुंबई इंडियन्सचा लोगो देखील लोगो आहे.

लॉरिट्झ नुडसेन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन हे यंदा मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचे पार्टनर असणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर समोरच्या बाजूला त्यांचं आहे. मात्र ही जर्सी चाहत्यांना मात्र काही आवडलेली नाही.

मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्याने इंस्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने संघाची जर्सी लाँच झाल्याबद्दल माहिती दिलीये. या चाहत्याप्रमाणे अनेक चाहत्यांना ही जर्सी आवडली नसल्याने सर्वांनी फ्रँचायझीवर टीका करण्यास सुरुवात केली.

काय आहे संपूर्ण गोष्ट?

या जर्सीवर चाहत्यांनी टीका केली मात्र त्या पोस्टची सत्यता कोणी पडताळली नाही. मुळात हा जर्सी लॉन्च इव्हेंट नसून तो स्पॉन्सर लॉन्च इव्हेंट होता. फ्रँचायझीने त्याच्याशी संबंधित नवीन प्रायोजकांना जर्सीमध्ये स्थान देत ही जर्सी चाहत्यांसमोर आणली. ज्या जर्सीवर प्रायोजकांची नावं छापण्यात आली होती ती जर्सी खेळाडूंची असल्याचं चाहत्यांना वाटलं. त्यामुळे येत्या सिझनमध्ये मुंबईचे खेळाडू ही जर्सी घालणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

Maharashtra Politics: कोकणात ठाकरेंची स्पेस 'झिरो'? राणे बंधूंचीच चर्चा, ठाकरे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT