arjun tendulkar yandex
Sports

Arjun Tendulkar: मुंबई इंडियन्सने सचिनचा मान राखला; Unsold अर्जुन तेंडुलकरला अखेरच्या ५ मिनिटांत 'इतक्या' रुपयांत घेतलं संघात

Arjun Tendulkar IPL Auction 2025: लिलावात तो पहिल्यांदा अनसोल्ड राहिला होता. मात्र अखेर अर्जुनच्या मदतीसाठी मुंबई इंडियन्सची टीम पुन्हा एकदा धावून आली.

Surabhi Jayashree Jagdish

मार्चपासून आयपीएल २०२५ चा थरार रंगणार आहे. यापूर्वी आयपीएलसाठी मेगा ऑक्शन घेण्यात आलं. या ऑक्शनमध्ये क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मोठा झटका लागला होता. या लिलावात तो पहिल्यांदा अनसोल्ड राहिला होता. मात्र अखेर अर्जुनच्या मदतीसाठी मुंबई इंडियन्सची टीम पुन्हा एकदा धावून आली.

लिलावामध्ये पहिल्यांना अर्जुनला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. अर्जुन अनसोल्ड राहिल्यामुळे सर्वच क्रिडाप्रेमींना मोठा धक्का बसला होता. मात्र दुसऱ्यांदा ज्यावेळी अर्जुनचं नाव पुन्हा घेण्यात आलं तेव्हा मुंबईच्या टीमने त्याला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. मुंबई इंडियन्सने अर्जुनला ३० लाखांच्या बेस प्राईजवर खरेदी केलं आहे.

रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये केलं होतं डेब्यू

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या टीममध्ये अर्जुनने डेब्यू केलं होतं. अर्जुनला आयपीएलमध्ये 5 सामने खेळायला मिळाले होते. ज्यामध्ये त्याने केवळ 3 विकेट घेतल्या. त्याच वेळी, आयपीएलच्या 17 व्या सिझनच्या मेगा लिलावापूर्वी मुंबईने त्याला रिलीज केलं होतं. 30 लाखांच्या बेस प्राईससह मेगा लिलावात सहभागी झालेल्या अर्जुनमध्ये कोणत्याही टीमने रस दाखवला नाही. मात्र दुसऱ्यांदा अर्जुनच्या नावावर मुंबई इंडियन्सने विकत घेण्यासाठी रस दाखवला.

मेगा ऑक्शनपूर्वी अर्जुनकडून मोठी चूक

आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी फ्रँचायझींचं लक्ष खेळाडूंकडे होतं. अनेक खेळाडूंनी टीमचं लक्ष वेधून घेण्यासाठी चांगली कामगिरी देखील केली. मात्र मेगा लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरची कामगिरी काही खास नव्हती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जुनला चांगली होती, पण तो चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. या सिरीजमधील एका सामन्यात 4 ओव्हर्समध्ये 48 रन्स दिले.

१३ वर्षांच्या खेळाडूवरही लागली बोली

आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी वैभव सूर्यवंशी या खेळाडूच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली होती. या खेळाडूला वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी करोडपती म्हणून टॅग करण्यात आलाय. सचिन-सेहवागचा विक्रम मोडण्यासाठी वैभव अजूनही दावेदार मानला जातोय. सीएसकेने या खेळाडूला 1.1 कोटी रुपयांमध्ये आपल्या टीममध्ये समाविष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT