Mumbai Indians Bowler Jofra Archer Injury Updates Saam TV
Sports

Jofra Archer Injury : जोफ्रा आर्चर आयपीएल २०२३ मधून बाहेर? फिटनेसबाबत रोहित शर्माने दिली महत्वाची अपडेट

Mumbai Indians Bowler : जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मुंबईला जोफ्रा आर्चरकडून आशा आहेत. पण चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तोही संघाचा भाग होऊ शकला नाही.

Satish Daud

Jofra Archer Injury Updates : आयपीएलच्या इतिहासात पाचवेळा चॅम्पियनपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातील सुरूवात निराशाजनक झाली. आरसीबीविरोधातला पहिला सामना गमावल्यानंतर शनिवारी वानखेडे मैदानावर मुंबईने चेन्नईविरोधातला दुसरा सामनाही गमावला. यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे.

सलग दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) चाहते नाराज झाले आहेत. मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. मात्र, यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा दुखापतीमुळे एकही सामना न खेळता संपूर्ण १६ व्या हंगामातून बाहेर झाला. त्याच्या अनुपस्थितीत मुंबईला जोफ्रा आर्चरकडून आशा आहेत. पण चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तोही संघाचा भाग होऊ शकला नाही.

त्यामुळे बुमराहपाठोपाठ आता जोफ्रा आर्चर सुद्धा आयपीएलमधून बाहेर पडतो की काय? असा प्रश्न मुंबईच्या चाहत्यांना पडला. दरम्यान, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने जोफ्रा आर्चरच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.  (Latest sports updates)

जोफ्रा आर्चर आयपीएल 2023 मधून बाहेर?

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळताना जोफ्रा आर्चरला दुखापत झाली. आर्चरच्या डाव्या कोपरात काही त्रास झाला होता, असा दावा काही अहवालांनी केला आहे. मात्र, दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नाणेफेकदरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) याबाबत विचारले असता तो म्हणाला, "जोफ्रा आर्चरच्या कोपरात त्रास होत आहे. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही, अधिक खबरदारीचा निर्णय म्हणून आम्ही त्याला आजच्या सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे".

जोफ्रा आर्चर आयपीएल खेळणार की नाही?

मीडिया रिपोर्ट्नुसार, आरसीबीविरुद्धच्या सामन्यानंतर आर्चरने सराव शिबिरात फार कमी भाग घेतला. मात्र, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याने कसून सराव केला होता. जोफ्रा आर्चर मुंबईत सुद्धा आला. त्याने प्रॅक्टिस सेशनमध्ये सुद्धा सहभाग घेतला. मात्र, कोपराचा अधिकच त्रास जाणवू लागल्याने तो चेन्नईविरुद्धचा सामना खेळू शकला नाही. आता जोफ्रा आर्चरची ही दुखापत बरी होण्यासाठी किती वेळ लागेल? हे अद्याप तरी समोर आलेले नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drink water after urination: लघवी केल्यानंतर किती वेळ पाणी पिऊ नये?

Maharashtra News Live Update: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी कायम

Panvel Fort : पनवेलजवळील 'हा' किल्ला पावसाळ्यात ट्रेकर्ससाठी ठरतो खास आकर्षण

Health Care : पावसाळ्यात केळी खाल्ल्याने सर्दी होते का? वेळेत जाणून घ्या नाहीतर...

Crime News: मुंडकं छाटलं, दोन्ही हात तोडले; निर्जनस्थळी फेकला मृतदेह, ठाण्यातील हत्याकांडानं महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT