IPL 2024, Hardik Pandya, Rohit Sharma, Mumbai Indians PTI
क्रीडा

Hardik Pandya : शेवटचा दिस 'कडू' झाला! पराभव तर पराभव, त्यात हार्दिक पंड्या, रोहित शर्मासह अख्ख्या मुंबई संघावर कारवाई

Mumbai Indians In IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा आयपीएल स्पर्धेचा शेवट पराभवाने झालाच, शिवाय हार्दिक पंड्या, रोहित शर्मासह संपूर्ण मुंबई इंडियन्सवर कारवाईही झाली.

Nandkumar Joshi

आयपीएलची अखेर समाधानी असावी, अशी मुंबई इंडियन्सचा संघ, व्यवस्थापन आणि कोट्यवधी चाहत्यांची इच्छा होती. पण शेवटचा दिस गोड होण्याऐवजी 'शेवटचा दिस कडू झाला', असं आता म्हणावं लागणार आहे. कारण आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात हार्दिकच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला लखनऊ संघाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवासह मुंबई इंडियन्सवर शेवटच्या सामन्यात कारवाई झालीच, पण नेतृत्व करणाऱ्या हार्दिकवरही कारवाईची कुऱ्हाड कोसळली. स्लो ओव्हर रेटमुळं त्याला ३० लाखांचा दंड सुनावला. तर एका सामन्याची बंदीही घातलीय.

स्लो ओव्हर रेटमुळं हार्दिक पंड्यावर (Hardik Pandya) दंडाची कारवाई झालीय. या मोसमात हार्दिक तिसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी आढळला आहे. त्यामुळं ३० लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला. तसेच त्याच्यावर पुढच्या सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. इतर खेळाडू आणि इम्पॅक्ट प्लेअरवरही (Impact Player) कारवाई झाली असून, दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर प्रत्येक खेळाडूला १२ लाखांचा दंड किंवा सामन्याच्या मानधनातील किमान रक्कम किंवा ५० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे.

मुंबईच्या वानखेडे मैदानात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स (LSG) यांच्यात सामना झाला. त्यात मुंबई इंडियन्सला १८ धावांनी पराभव पत्करावा लागला. लखनऊनं प्रथम फलंदाजी करताना निकोलस पूरनच्या तडाखेबंद अर्धशतकी खेळीच्या जोरावर २१४ धावांचा डोंगर उभारला होता. मुंबई इंडियन्सच्या संघाला हा आव्हानाचा डोंगर पार करता आला नाही. २० षटकांत ६ विकेट गमावून १९६ धावांपर्यंतच मजल मारता आली.

मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या १७ व्या मोसमाची अखेर पराभवानं झाली. या मोसमात मुंबईला १४ पैकी अवघ्या ४ सामन्यांत विजय मिळवता आला. गुणतालिकेत संघ शेवटच्या स्थानी राहिला. विशेष म्हणजे मुंबई यंदाच्या आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला.

५ वेळा चॅम्पियन, पण यंदा सर्वात खराब कामगिरी

मुंबई इंडियन्स संघानं आयपीएलचं पाच वेळा जेतेपद पटकावलं आहे. पण यंदा मुंबईला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या मोसमात मुंबई इंडियन्सला प्ले ऑफच्या फेरीतही प्रवेश करता आला नाही. कर्णधार बदलला. हार्दिककडे नेतृत्व दिलं. पण कामगिरी अत्यंत सुमार झाली. मुंबई इंडियन्सची कामगिरी आयपीएलच्या इतिहासात सर्वात खराब झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT