Shreyas Iyer Rohit Sharma Watch Video twitter
Sports

Rohit Sharma : रोहितची एन्ट्री होताच श्रेयस अय्यर जागेवरून उठला आणि...; अवॉर्ड फंक्शनमध्ये खेळाडूने जिंकलं मन

Shreyas Iyer Rohit Sharma Watch Video : रोहित शर्मा ‘सिएट क्रिकेट रेटिंग अवार्ड्स’ मध्ये सहभागी झाला होता. या कार्यक्रमात रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केवळ भारत नाही तर जगभरात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे अनेक चाहते आहेत. इतकंच नाही तर भारतीय संघात देखील रोहित शर्माच्या चाहत्यांची कमी नाहीये. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आदर देखील तितकाच मिळतो. नुकतंच एका अवॉर्ड शोमध्ये याची प्रचिती आली. यामध्ये श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

केवळ खेळाडू म्हणून नाही तर एक कर्णधार म्हणून देखील रोहितची कामगिरी उत्तम आहे. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये जशी रोहित शर्माने एन्ट्री केली तसा पहिल्याच खुर्चीत बसलेला टीम इंडियाचा मिडल ऑर्डर फलंदाज श्रेयस अय्यर उठून उभा राहिला. रोहित शर्माचा आदर करत श्रेयसने लगेच त्याच्यासाठी आपली खुर्ची हिटमॅनला त्याला दिली. यावेळी अय्यर स्वतः जाऊन बाजूच्या खुर्चीवर बसला. दरम्यान यावेळी या दोघांच्या ब्रोमांसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्रेयसने रोहित शर्माला खुर्ची केली ऑफर

रोहित शर्मा ‘सिएट क्रिकेट रेटिंग अवार्ड्स’ मध्ये सहभागी झाला होता. या ठिकाणी रोहित शर्माला सर्वश्रेष्ठ पुरु इंटरनॅशनल क्रिकेटर म्हणून अवॉर्ड देण्यात आला. याच इव्हेंटमध्ये श्रेयस अय्यरने रोहित शर्मासाठी आपली खुर्ची दिली. एका वरिष्ठ खेळाडूचा आदर म्हणून श्रेयस अय्यरने खूप उत्तम काम केल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.

रोहित आणि द्रविड यांचा गौरव

भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या तसंच दमदार कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तसंच केवळ रोहित शर्मा नाही तर टी-२० वर्ल्डकपमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा लाईफटाईम अचिवमेंट अवॉर्ड हा अवॉर्ड देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

SCROLL FOR NEXT