मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) वानखेडे स्टेडियमला ५० पूर्ण होत आहेत. या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. मुंबई क्रिकेटचा गौरव वाढवणाऱ्या या स्टेडियमचा ५० वा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी जानेवारी २०२५ मध्ये खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी ही घोषणा केली आहे. या उत्सवाला १२ जानेवारीपासून सुरुवात होणार असून, १९ जानेवारीला भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.
या कार्यक्रमाचा समारोप सोहळा १९ जानेवारी रोजी होणार आहे. या भव्य दिव्य सोहळ्याला मुंबईसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे आजी- माजी सर्व दिग्गज खेळाडू एकत्र येतील. या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे, संगीतकार अजय -अतुल आणि प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या गायनाचा कार्यक्रम असणार आहे. यासह लेझर शोचे देखील आयोजन केले जाणार आहे.
गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत, एमसीएच्या सदस्यांनी अॅपेक्स काऊन्सिलच्या उपस्थितीत ५० व्या वर्धापनानिमित्त खास लोगोचे अनावरण केलं. यासह १९ जानेवारी रोजी स्टेडियमच्या समृद्ध वारशाचा सन्मान करण्यासाठी स्मृती टपाल तिकीट आणि कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्याची योजना देखील जाहीर केली. या कार्यक्रमासाठी सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी बोलताना श्री. अजिंक्य नाईक म्हणाले, “वानखेडे स्टेडियम हे राष्ट्राचा अभिमान आहे आणि त्याचा ५०वा वर्धापनदिन हा आमच्यासाठी ऐतिहासिक टप्पा आहे. हे स्टेडियम खेळाडू आणि चाहत्यांसाठी असंख्य अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार राहिले आहे. आठवडाभर चालणाऱ्या उत्सव आणि भव्य समारोप कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही या स्टेडियमच्या समृद्ध क्रिकेट वारशाचा आणि गौरवशाली प्रवासाचा सन्मान करण्याचा प्रयत्न करत आहोत. क्रिकेटचा वारसा साजरा करणे हा एमसीएसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी संपूर्ण क्रिकेट समुदायाला एकत्र आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.