IND VS WI: भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ लवकरच आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे.
या मालिकेत युवा खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून येणार आहेत. तर असा एक गोलंदाज देखील या मालिकेतून पदार्पण करू शकतो, जो जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीपेक्षाही घातक गोलंदाजी करू शकतो.
भारतीय संघात घातक गोलंदाजाची एंट्री...
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला जसप्रीत बुमराह आता कमबॅक करण्याच्या वाटेवर आहे. दरम्यान त्याच्या कमबॅकपूर्वीच भारतीय संघात एका घातक गोलंदाजाची एंट्री झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणाऱ्या मुकेश कुमारने आपल्या अप्रतिम गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी...
मुकेश कुमार हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाचे प्रतिनिधित्व करतो. या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ३९ सामन्यांमध्ये १४९ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने ६ वेळेस एकाच डावात ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.
त्याने बिहारच्या अंडर -१९ संघाचे देखील प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर त्याचे वडील नोकरीच्या शोधात कोलकात्याला गेले. क्रिकेटपटू होण्यापूर्वी त्याने CRPF साठी प्रयत्न केले. मात्र मेडिकल चाचणीत फेल झाल्यामुळे त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे १६ सदस्यीय कसोटी संघ (Team India Test Squad For West Indies Tour) :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.