MS Dhoni Saam TV
Sports

MS Dhoni: 'माही'ची चित्रपट क्षेत्रात एन्ट्री, IPL संपताच करणार मोठी घोषणा!

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार (Chennai Super Kings) एमएस धोनी (MS Dhoni) आता फिल्मी दुनियेत प्रवेश करणार आहे.

Pravin

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार (Chennai Super Kings) एमएस धोनी (MS Dhoni) आता फिल्मी दुनियेत प्रवेश करणार आहे. IPL 2022 नंतर याबाबत मोठी घोषणा केली जाऊ शकते. महेंद्रसिंग धोनी हा केवळ आयपीएलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली विश्वचषक, T20 विश्व आणि अनेक ट्रॉफी देशाला जिंकून दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला एमएस धोनी आता निर्माता बनून तमिळ चित्रपट उद्योगात (कॉलीवूड) प्रवेश करू शकतो.

रिपोर्ट्सनुसार, धोनी तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये निर्माता बनून या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहे. या निर्मितीसाठी सध्या काम सुरू असून, एक मजबूत टीम तयार केली जात आहे. आयपीएल 2022 नंतर याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. एमएस धोनी जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे, आजही त्याचे देशातील इतर क्रिकेटर्सपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. क्रिकेट व्यतिरिक्त एमएस धोनी शेती देखील करतो. तो रांची येथील फार्म हाऊसवर शेती करतो, याचे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान एमएस धोनी सध्या चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या जिवनावर आधारित एक चित्रपट या अगोदर येऊन गेला आहे. बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने ही भूमिका अगदी लिलया साकारली होती. धोनीला चित्रपटाची आवड आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT