ms dhoni saam tv
Sports

MS Dhoni Ban In IPL? : CSK च्या फॅन्सला मोठा धक्का! IPL मध्ये धोनीवर बंदी येणार? वाचा काय आहे कारण

Virender Sehwag On MS Dhoni: एमएस धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील दिग्गज कर्णधार आहे. त्याची लोकप्रियता ही दिवेसंदिवस वाढतच चालली आहे.

Ankush Dhavre

IPL CSK News: एमएस धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील दिग्गज कर्णधार आहे. त्याची लोकप्रियता ही दिवेसंदिवस वाढतच चालली आहे. त्याचा चाहतावर्ग हा जगभरात पसरला आहे. मात्र आता त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

लवकरच एमएस धोनीवर बंदी लागू शकते. असा अंदाज माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने केला आहे. काय आहे प्रकरण? जाणून घ्या.

चेन्नई सूपर किंग्ज हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरा सर्वात मजबूत संघ आहे. मात्र या हंगामात चेन्नई संघात अनुभवी गोलंदाजांची कमतरता दिसून येत आहे.

लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी अतिरिक्त धावा खर्च करण्याची मर्यादा ओलांडली होती. त्यावेळी एमएस धोनीने आपल्या गोलंदाजांना वॉर्निंग देखील दिली होती.

मात्र हिच कामगिरी रॉयल चॅलेंजर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील पाहायला मिळाली होती. या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजांनी ११ अतिरिक्त धावा दिल्या होत्या.

काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?

या सामन्यानंतर वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, अशीच गोलंदाजी सुरु राहिली तर एमएस धोनीवर स्लो ओव्हर रेटमुळे बंदी घातली जाऊ शकते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजय मिळवला होता. मात्र तरीदेखील एमएस धोनी खुश दिसून येत नव्हता. कारण गोलंदाजांनी ११ अतिरिक धावा खर्च केल्या होत्या. (Ms Dhoni)

चेन्नईचे गोलंदाज जर अशीच गोलंदाजी करत राहिले तर एमएस धोनीवर स्लो ओव्हर रेटमुळे कारवाई केली जाऊ शकते. तसेच एमएस धोनीवर मैदानात उतरण्यास बंदी देखील घातली जाऊ शकते. अशा परिस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज संघाला कर्णधाराशिवाय मैदानात उतरावं लागू शकतं. (Latest sports updates)

चेन्नईचा जोरदार विजय..

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २२६ धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून शिवम दुबे आणि डेवोन कॉनव्हेने अप्रतिम फलंदाजी केली.

शिवम दुबेने या डावात फलंदाजी करताना ५२ तर कॉनव्हेने ८३ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. विराट कोहली स्वस्तात माघारी परतला.

त्यानंतर फाफ डू प्लेसिसने ६२ आणि ग्लेन मॅक्सवेलने ७२ धावांची खेळी केली. मात्र इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ८ धावांनी गमावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT