भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करुन काही वर्षे उलटून गेली आहेत. मात्र त्याची क्रेझ काही कमी झालेला नाही. सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु असते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एमएस धोनी बॅडमिंटन खेळताना दिसून येतोय.
एमएस धोनी आपल्या मित्रांसह बॅडमिंटन खेळताना दिसून आला आहे. क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकांराचा पाऊस पाडणारा धोनी बॅडमिंटन कोटमध्येही आपला जलवा दाखवताना दिसून येतोय. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, धोनी आपल्या मित्रांसह खेळत असताना स्मॅश मारताना दिसून येतोय. या व्हिडिओवर नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २००७, वनडे वर्ल्डकप २०११ आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ स्पर्धेत विजय मिळवला होता. दरम्यान १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने पोस्ट शेअर करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत असल्याची माहिती दिली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला असला तरीदेखील तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येतोय. आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्याऐवजी ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
एमएस धोनी आयपीएल २०२५ स्पर्धेत खेळणार की नाही, हे आयपीएल लिलावासाठी काय निर्णय घेतले जाणार यावर अवलंबून आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ धोनीला रिटेन करणार की धोनी अन्कॅप्ड खेळाडू म्हणून खेळणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.